—
नांदेड, दि. 17 –
जलनेते तथा माजी केंद्रीय मंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुसुम महोत्सवा अंतर्गत फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या भव्य दिव्य चित्रकला व रंगभरण स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी कुसुम सभागृहात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत थाटात पार पडला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात विजेत्या स्पर्धकांना सुमारे दोन लाख चार हजार रुपयांची रोख बक्षिसे आणि उत्तेजनार्थ स्पर्धकांना सुमारे 40 अत्याधुनिक सायकलींचे वितरण करून त्यांच्या सुप्त कलागुणांचा सन्मान करण्यात आला.
मराठवाड्याचे भगिरथ डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी, मिडीया पार्टनर दैनिक लोकमत आणि दैनिक सत्यप्रभा यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुम महोत्सव अंतर्गत दि. 26 फेब्रुवारी रोजी यशवंत महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत 15 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कोरोना महामारीमुळे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा लांबणीवर पडला. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी हा बक्षिस वितरण सोहळा घेण्यात आला.
कार्यक्रमात बालवाडी ते दुसरी (गट अ), तिसरी ते चौथी (गट ब), पाचवी ते सातवी (गट क) आणि आठवी ते दहावी (गट ड) अशा चार गटातून प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दहा उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली. प्रथम पारितोषिक 25 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 15 हजार रुपये तर अकरा हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक देण्यात आले.
‘अ’गटातून प्रथम पारितोषिक शारव सचिन देशमुख (वर्ग पहिला) ज्ञानमाता विद्यालय नांदेड, दिव्तीय पारितोषिक फौजिया मोईन सय्यद, (यूकेजी) लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल नांदेड, तृतीय पारितोषिक प्रीती रामेश्वर गिरी (वर्ग पहिला ) महात्मा फुले हायस्कूल विजय नगर नांदेड यांना मिळाले असून उत्तेजनार्थ पारितोषिक कोनिका हिृतेश चोपकर (एलकेजी), सर्वोदया स्कूल नांदेड, प्रणव प्रदीप सोमानी (युकेजी), भानुमती वर्मा बालक मंदिर नांदेड, सहरीश फातुज (वर्ग पहिला) सना अँग्लो उर्दू प्राथमिक शाळा नांदेड, अश्वस्थ रावसाहेब हातोडे (यूकेजी), ट्विंकल लँड स्कूल विवेक नगर नांदेड, माणिक गजानन पांचाळ, शंकरराव चव्हाण इंटरनॅशनल स्कूल नांदेड, गायकवाड साई कैलास (वर्ग पहिला) परफेक्ट प्रायमरी इंग्लिश स्कूल पेटवडज जिल्हा नांदेड, फातिमा खान (वर्ग पहिला), सना स्कूल नांदेड, जुनेराझीयन शेख अजिज, (वर्ग पहिला), मनपा उर्दू शाळा नांदेड, गौसिया फातेमा मौला अली (वर्ग पहिला), मनपा उर्दू शाळा नांदेड, जीविका प्रदीप कोंडामंगल (वर्ग पहिला) विवेक वर्धिनी शाळा यशवंत नगर नांदेड.
‘ब’ गटातून प्रथम पारितोषिक महेश भास्कर रानवळकर, (वर्ग चौथा) महात्मा फुले प्राथमिक शाळा बाबा नगर नांदेड, द्वितीय पारितोषिक वेदिका विशाल गंडरघोळ (वर्ग चौथा) श्री भगवानराव नवाचे मेमोरियल प्रतिभा निकेतन प्राथमिक विद्यालय, खुशी सचिन दवंडे (वर्ग चौथा) ज्ञानमाता विद्यालय नांदेड. उत्तेजनार्थ प्राची ढवळे (वर्ग चौथा) ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल नांदेड, साईनाथ माधव कदम (वर्ग तिसरा) जिल्हा परिषद हायस्कूल बारड, वेदिका संजय राखेवार (वर्ग तिसरा) नागार्जुन पब्लिक स्कूल नांदेड, दुर्गा प्रकाश दर्शने (वर्ग चौथा) इंदिरा गांधी प्राथमिक शाळा नांदेड, रेणुका संतोष अन्नपूर्णे (वर्ग चौथा) केंब्रिज विद्यालय नांदेड, समीक्षा बाळासाहेब बेडेकर, (वर्ग तिसरा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव कॅम्प, सायली अशोक हिंगोले (वर्ग चौथा), नेहरू इंग्लिश स्कूल खडकपुरा नांदेड, श्रावणी संतोष गोरे (वर्ग तिसरा) होली सिटी पब्लिक स्कूल नांदेड, मुज्जमा काशेफ मोहम्मद अहमद (वर्ग चौथा) सना उर्दू प्राथमिक शाळा नांदेड, हर्षदा गंगाप्रसाद संगमवार (वर्ग तिसरा), गुजराती प्राथमिक शाळा नांदेड.
‘क’ गटातून प्रथम पारितोषिक घनश्याम शिवकुमार उपलंचवार (वर्ग सहावा) कै. नाना पालकर प्राथमिक विद्यालय नांदेड, द्वितीय पारितोषिक आसावरी संतोष भोसिकर (वर्ग सातवा) महात्मा फुले हायस्कूल बाबा नगर नांदेड, तृतीय पारितोषिक उमा कैलास तुमलवाड (वर्ग सातवा) श्री शारदा भवन हायस्कूल जुना मोंढा नांदेड. उत्तेजनार्थ पारितोषिक वरद ज्ञानेश्वर गव्हाणकर (वर्ग सहावा) गुजराती हायस्कूल वजीराबाद नांदेड, कुवम राठोड (वर्ग सातवा) नागार्जुन पब्लिक स्कूल नांदेड, रूपाली आनंद गायकवाड (वर्ग सातवा) महात्मा फुले हायस्कूल विजय नगर नांदेड, सोनम चंद्रकांत खंदारे (वर्ग सहावा) राष्ट्रमाता इंदिरा गांधी प्राथमिक शाळा, चंद्रशेखर मारोती डाकोरे (वर्ग सातवा) साधना हायस्कूल देगलूर, साईशा प्रकाश सिंगरवाड (वर्ग सातवा) केंब्रिज विद्यालय नांदेड, वैष्णवी गजानन येवले (वर्ग सातवा) महात्मा फुले हायस्कूल विजय नगर नांदेड, वैद्य समीक्षा शंकर (वर्ग 7वा) सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबा नगर नांदेड, जय रवी आवटे (वर्ग पाचवा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी बुद्रुक, सुखदा संजराव पांडे (वर्ग सहावा) किड्स किंग्डम पब्लिक स्कूल नांदेड.
‘ड’गटातून प्रथम पारितोषिक कु. पूजा माधव जाधव (वर्ग आठवा) जिल्हा परिषद हायस्कूल माळकौठा, ता.मुदखेड, द्वितीय पारितोषिक सुमय्या तब्बसूम मोहम्मद शकील अहमद (वर्ग दहावा) मदिना तुल उलूम हायस्कूल नांदेड, तृतीय पारितोषिक तन्मयी संभाजी वडजे (वर्ग दहावा) डॉ. नारायणराव भालेराव हायस्कूल नांदेड. उत्तेजनार्थ पारितोषिक ओमकार धोंडीबा तेलंग (वर्ग 9वा) कुसुमताई हाई स्कूल सिडको नांदेड, रितू काशिनाथ फाजगे (वर्ग 9वा) महात्मा फुले हायस्कूल बाबा नगर नांदेड, आदित्य देवेंद्र खडसे (वर्ग आठवा) लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल नांदेड, विजय नरेंद्र बुरसे (वर्ग 9 वा) श्री शिवाजी हायस्कूल माणिक नगर नांदेड, स्मिती संदीप वानखेडे (वर्ग आठवा) गुजराती हायस्कूल वजीराबाद नांदेड, वैष्णवी वसंत इंगोले (वर्ग दहावा) समता विद्यालय उस्मान नगर नांदेड, सुरज भारत अडबलवार (वर्ग 9वा) गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल नांदेड, वैष्णवी साईनाथ शिंदे (वर्ग 9वा) जिल्हा परिषद हायस्कूल तामसा, उजमा फिरदोस शेख उस्मान (वर्ग 9 वा) फैजुल उलूम हायस्कूल नांदेड आणि आसावरी अनिल गजभारे (वर्ग 9वा) केंब्रिज विद्यालय शिवाजीनगर, नांदेड यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह आ. बालाजीराव कल्याणकर, आ. माधवराव जवळगावकर , आ. रावसाहेब अंतापूरकर, आ. मोहन अण्णा हंबर्डे, आ. शामसुंदर शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षाताई धबाले, काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के, दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, महिला व बाल विकास कल्याण समितीच्या सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर, मनपातील सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले , माजी आ. हनुमंत पाटील बेटमोगरेकर, नगरसेवक संदीप सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी प्रास्ताविक आ.अमरनाथ राजूरकर यांनी केले. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अध्यक्षीय समारोप केला. आ.बालाजीराव कल्याणकर, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. मोहन अण्णा हंबर्डे,विशाल सोनटक्के,संतोष पांडागळे यांनी विजेत्या स्पर्धकांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.—-