मुंबईत लहानाचा मोठा झालेला मुलगा जो सध्या दुबईत रहातो त्याला काउन्सिल हवं होतं.. कॉंव्हेंटमधे शिकलेली मुलं / इंग्लिश मिडीअमची मुलं आणि मराठी माध्यमात शिकलेली मुलं यांच्या बोलण्यात खूपच मोठा फरक दिसतो.. बऱ्याचदा मराठी येत असताना इंग्रजी बोलण्याचा त्यांचा अट्टाहास दिसतो.. अशी मुलं बऱ्याचदा व्याकरणात चुकतात पण त्यांच्यात आत्मविश्वास एवढा ठासून भरलेला असतो कि त्यांना चुक आहे असं सांगितले तरीही त्यांच्या चेहऱ्यावरची माशीही हलत नाही..
त्याउलट मराठी माध्यमात मराठी इतकच इंग्रजीही उत्तम करुन घेतलं जातं त्यामुळे ती मुलं ग्रॅमॅटिकली शक्यतो चुकत नाहीत पण बऱ्याचदा मराठीचं इंग्रजीत करताना कधी कधी थोडा आत्मविश्वास कमी पडतो.. काल त्या २७ वर्षीय मुलाचं काऊंसिलींग करत असताना तो पटकन म्हणाला , I have read your humongous books mam.. त्यावर त्याला म्हटलं माझी किती पुस्तके वाचली ??.. तो २ असं म्हणाला..त्यावर त्याला म्हटलं , ह्युमंगस हा शब्द खुप जास्त किवा भरपूर किवा मोठी यासाठी वापरतात.. म्हणजेच लायब्ररीसाठी आपण वापरु शकतो ..२ पुस्तकासाठी हा शब्द वापरत नाहीत.. मुळात तो जड शब्द तिथे वापरायची गरजच नव्हती.. कधी कधी समोरच्याला इंप्रेस करायला असे शब्द वापरले जातात आणि तोंडावर पडतात.. त्यापेक्षा जिथे जिथे आणि जेव्हा जेव्हा आपल्या भाषेत बोलता येइल तिथे तिथे तसच बोलावं नाहीतर मराठीत सुद्धा भेटले आणि मिळाले यात आजही गफलत आहे.. या दोनपैकी कुठला शब्द कुठे वापरायचा हे लोकांना कळतच नाही.. तसच न आणि ण यात म्हणजे कहरच आहे.. मालिकेत सुध्दा बोलायला लागले की असं वाटतं यांना पुन्हा शाळेत जायला सांगावं.. धड मराठीही नाही आणि धड इंग्रजीही नाही .. हिंदीचं तर विचारुच नका.. आपण राजकारणी हिंदी बोलताना पहातोच.. हसुन हसुन पुरेवाट होते..
एकंदर काय तर भाषेचा आनंद आहे.. तुम्हाला कळतय ना मग झालं अशी उत्तरं असतात पणआम्ही शिकणार नाही.. आम्ही सुधारणा करणार नाही .. आम्हीच बरोबर हा ॲटीट्यूड असतो.. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे पण अशुद्ध आणि शुद्ध नक्की काय याचं ज्ञान कोणालाच नाही.. लहेजा आणि शुद्धता याबद्दल डोक्यात काही घुसतच नाही.. Its humongous problem to our society आता कसं बरं वाटलं ना .. अपरोक्ष हा शब्द आपण सहज वापरतो पण खरा शब्द परोक्ष आहे.. तुम्हाला माहीत असलेले मराठी शब्द या लेखाखाली जरुर लिहा..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist