अर्थात हा माझा प्रयोग होता आणि तो सक्सेस झाला आहे.. साधारणपणे महिन्याभरापुर्वीची गोष्ट असेल.. एक आयडीयाची कल्पना डोक्यात आली आणि ती अमलात आणली आणि आज महिन्याभरानतर जेव्हा त्याचा रिझल्ट आला तेव्हा आनंद गगनात मावेनासा झाला.. मी १००पैकी १०० गुणाने उत्तीर्ण झाले असं वाटलं..
लेखातुन किवा व्हीडीओतुन कितीही जरी सांगितले की जप करा , हरिनाम घ्या.. तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका.. ८४ लक्ष योनीनंतर आपल्याला हा मनुष्य देह मिळतो आणि त्याचा मुळ उद्देश हा भगवदप्राप्तीच असायला हवा .. लोक वाचतात किवा ऐकतात आणि सोडून देतात कारण त्यांच्या दृष्टीने म्हातारपणी करायची ही गोष्ट आहे पण म्हातारपण येईल कि नाही हे कोणालाही माहित नाही.. भक्तीला महत्व दिलं जात नाही कारण त्यांच्या दृष्टीने जे घडतय ते सगळं आपण करत आहोत .. खरं तर आपण काहीच करत नाही हे भक्तीत आल्यावर जणवतं ..अनेकांचा तर भगवंतावर पण विश्वास नाही.. ज्याने सृष्टीची निर्मिती केली त्याला क्रेडीट न देता किवा त्याची कृतज्ञता व्यक्त न करता आपण आपल्यालाच मोठं करतो..
माझ्या घरामागे रिक्षास्टॅंड आहे तीथून टेकडीवर जाताना मी रोज पहाते तर रिक्षावाले पॅसेंजर ची वाट पहात हातात मोबाईल घेउन बसलेले असतात.. ते चित्र पाहून वाईट वाटलं कारण त्या रिकाम्या वेळात ते वाचू शकतात किवा हरिनाम घेउ शकतात.. त्यांना मी सांगायला गेले तर कदाचित आवडणार नाही त्यामुळे मला एक युक्ती सुचली… कागद पेन घेतला आणि त्यावर हरे कृष्ण महामंत्र लिहीला आणि खाली वाक्य लिहीलं.. आपण आपला मौल्यवान वेळ वाया घालवु नये.. रिकाम्या वेळात माझं नामस्मरण कर.. असं लिहून ती चिठ्ठी एका रिक्षावाल्याला दिली आणि निमूटपणे टेकडीवर नीघून गेले.. त्या रिक्षावाल्याचा चेहराही आठवत नव्हता आणि मी त्यांना चिठ्ठी दिली हे ही मी विसरले होते पण त्याने मला लक्षात ठेवले होते.. काल टेकडीवर जाताना त्याने मला हाक मारली आणि म्हणाले , ताई मनापासून आभार.. मी म्हटलं , कशाबद्दल ??.. तर ते म्हणाले , तुम्ही दिलेल्या चिठ्ठीबद्दल.. तेव्हा मला ते सगळं आठवलं .. त्यानंतर त्यांना म्हटलं. ऱोज जप करता का ??.. त्यावर ते म्हणाले , साक्षात भगवंताने तुम्हाला चिठ्ठी घेउन पाठवल्यावर मी करणारच की.. माझी बायको सुध्दा करते असं ते बोलले आणि माझ्या हातातील माळेतील मणी अजुन विश्वासाने पुढे पुढे सरकायला लागले.. मला माहित आहे अशी चिठ्ठी देउन किवा सांगून सगळेजण हे करतील असं नाही.. पण मग हा प्रश्न पडतोच ,मी त्यांनाच का चिठ्ठी दिली?.. हेही तितकच खरं आहे की मी फक्त माध्यम होते त्यामुळे क्रेडीट मी कधीही घेणार नाही.. खरं सांगु आता माझा कॉंफीडंस वाढला आहे.. आता हा प्रयोग मी अजून बऱ्याच ठिकाणी करणार आहे.. तुम्ही स्वतः आधी हरिनाम घ्या आणि हा प्रयोग करुन पहा.. रस्त्यावर कोणी थुंकलं तर , मी बऱ्याचदा ओरडते पण कृपया थुंकु नये अशी चिठ्ठी हळूच त्याच्या हातात सरकवायची आणि निघून जायचे.. कारण बऱ्याचदा आपल्यात थुंकु नका सांगायचे गट्स नसतात किवा त्याला अपमान झाल्यासारखा वाटतो त्यामुळे असं प्रेमपत्र हळूच द्या ..ही सुध्दा एक प्रकारची सेवाच आहे..
पहा करुन आणि रिझल्ट आला तर शेअर करायला विसरु नका... #SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist