धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे ) भारतीय संविधान प्रत्येकाला समान संधी देतं. तसं आपणास अधिकार आणि कर्तव्ये पण देतं. असं प्रतिपादन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डावरे व्ही आर यांनी केले.
ते येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात दि 26 नोव्हें 24 रोजी रासेयो विभागाने आयोजित केलेल्या संविधान दिनाच्या निमित्ताने प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ होळंबे टी एल होते. प्रा कातकडे के एस यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधान आणि राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढं बोलताना त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया, सभासद संख्या आणि कालावधी यावर मत मांडले. यावेळी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना एक मिनिट स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन प्रा डॉ देशमुख पी डी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा भगवान आमलापुरे यांनी केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा मुंडे जी आर आणि बी एस पेन्टूळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.