अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) आपण साक्षर झालो आहोत. आपण अर्थसाक्षरही झालं आहोत. पण आपणास आता संविधान साक्षर होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन माजी सभापती अॅड टी एन कांबळे यांनी केले.
ते येथील नांदेड रोडवरील कराड नगरस्थित ग्रामीण विकास लोक संस्था आणि संविधान प्रेमी मित्र मंडळ आयोजित संविधान दिनाच्या निमित्ताने अध्यक्षीय भाषणात बोलत होते. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते पंडित नेहरू, महात्मा गांधी संविधान उद्देशीका आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लगेचच मुखपृष्ठकार चंद्रशेखर भालेराव यांनी संविधान उद्देशीकेचे प्रकट वाचन केले.
पुढं बोलताना त्यांनी भारतीय संविधानात आजवर केलेल्या दुरुस्त्या सांगितल्या. न्यायव्यवस्थेत सर्व काही आलबेल नाही आहे . त्यामुळे संविधान साक्षर होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन माजी सभापती अॅड टी एन कांबळे यांनी केले. यावेळी प्रा गोविंदराव शेळके, मु अ शेषराव ससाणे, अशोकराव चापटे, राजेश शिराळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आणि आभार श्री मच्छिंद्र गोजमे यांनी मानले. श्री हरिदास तम्मेवार यांनी सुत्रसंचलन केले. लोकशाहीकार एन डी राठोड, दत्तात्रय कदम, पत्रकार रेड्डी प्रा भगवान आमलापुरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.