कंधार:प्रतिनिधी
३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो, त्याचाच एक भाग म्हणून फुलवळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा फुलवळचे माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांच्या वतीने दिव्यांग बांधवांना एकत्र बोलावून त्यांचा पुष्पहार घालून चहा फराळ देत गोडतोंड करून यथोचित सन्मान करण्यात आला.फुलवळ येथे माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांच्या संकल्पनेतून गेल्या सहा ते सात वर्षांपासून ३ डिसेंबर हा “जागतिक दिव्यांग दिन”म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, आणि या दिनानिमित्त फुलवळ येथील सर्व दिव्यांग बांधवांना एकत्र बोलावून त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, व चहा फराळ देऊन यथोचित सन्मान केला जातो.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त फुलवळ ग्रामपंचायत च्या वतीनेही दिव्यांग बांधवांचा पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला, तर फुलवळ येथील बसस्थानक शेजारी सागर मल्टी सर्विसेस यांच्या दुकानासमोर बालाजी देवकांबळे यांच्या संकल्पने मधून व पुढाकाराने दिव्यांग बांधवांचा भव्य असा सत्कार समारंभ कार्यक्रम फुलवळ नगरीच्या सरपंच सौ. विमलबाई मंगनाळे यांचे प्रतिनिधी नागनाथराव मंगनाळे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी मा.जि.प. सदस्य बाबुराव गिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे प्रारंभी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, व कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
मा.जि.प. सदस्य बाबुराव गिरे व फुलवळ ग्रामपंचायतचे जेष्ठ सदस्य चनबस आप्पा , जयवंतराव मंगनाळे यांच्या वतीने दिव्यांग बांधवांना नगदी स्वरूपात बंद लिफाफ्याद्वारे आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी फुलवळ ग्रामपंचायतचे जेष्ठ सदस्य चन बसआप्पा मंगनाळे, प्रवीण मंगनाळे,शिवदास सोमासे, सामाजिक कार्यकर्ते आनंदा पवार, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्ता डांगे, व्यंकटराव शेळगावे, सामाजिक कार्यकर्ते विलास वाघमारे, धोंडीबा बोरगावे , मधुकर डांगे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व दिव्यांग बांधव व भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.