देवेंद्र फडणवीस यांच्या गटनेतेपदी निवडीचा कंधारात भाजपाच्या वतीने जल्लोष

कंधार ; प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व महायुतीस बहुमत मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी कंधारच्या वतीने छ. शिवाजी महाराज चौक येथे आतिषबाजी व मिठाईवाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

आधुनिक महाराष्ट्राचे नेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र बलशाली होईल आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल व महाराष्ट्र विकसित राष्ट्र म्हणून देशा समोर येईल या निवडी बद्दल भारतीय जनता पार्टी कंधार च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आतिषबाजी करून ढोल ताशांच्या गजरात शहरात मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला .

यावेळी नांदेड लोकसभा विस्तारक अँड गंगाप्रसाद यन्नावार, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गर्जे, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष निलेश गौर, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष डॉ जयमंगला औरादकर माजी नगरसेविका वंदना डुमने,अँड सागर डोंगरजकर, प्रविण बनसोडे, व्यंकट नागलवाड ,कैलास कांबळे,व्यंकट चौधरी,

विकी रहाटे,अभिजित इंदुरकर,रवि संगेवार,शुभम संगनवार,श्रेयस लाठकर, रामदास बाबळे, शुभम प्रेमलवाड, कृष्णा टोकलवाड, अमरदीप येवतीकर,केदार मुत्तेपवार, मोहम्मद फारूक,बालाजी तोटावाड, मनोज कांबळे, संतोष कांबळे, संदीप आलेगावकर,यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *