कंधार ; प्रतिनिधी
संपूर्ण जग ३ डिसेंबर १९८१ पासून दरवर्षीच दिव्यांग दिन करत असतो.१९७६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम सभेत विकलांगासाठी अंतराष्ट्रीय वर्ष म्हणुन १९८१ घोषित करण्यात आले.तेंव्हापासून जागतिक अपंग दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.काल सकाळी ठीक ९ वाजता कंधार येथील बस स्थानकात प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालय शाखा कंधारच्या मा. ज्योति बहेनजी यांनी येणाऱ्या
नुतन वर्ष २०२५ ची दिनदर्शिका देवून मला वर्षभरातल्या ३६५ दिवसाचे स्मरण करुन देण्यासाठी अनोखी सस्नेसभेट दिल्याने दररोज एक प्रबोधनात्मक काव्य लेखन करण्याची उर्जा दिली.त्यानंतर सायंकाळी क्राॅग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा सचिव व माजी जि.प.सदस्य मा.संजयजी भोसीकर साहेब यांनी फोन करून घरी येण्याचे निमंत्रण दिले.त्यावेळी माझे कंधारी आग्याबोंड सदर लेखन सुरु होते.दिव्यांगांच्या वेदनांचा हूंकार, शासनास कधी कळला नाही? दिव्यांग दिन फक्त कागदावर, पण साजरा झालाच त्यावेळी, हारा शिवाय दुसरे कांही नाही?सहानुभूती अन् शुभेच्छा शिवाय, शासनसाह्य तुटपूंजे, पुष्कळ नाही? दिव्यांग महामंडळ अस्तित्वात आहे, नफा-तोटा दिव्यांगांना झाला किती, याचा लेखा-जोखा कुठे दिसत नाही?बोगस दिव्यांगाच्या प्रमाणपत्राची, पुजा खेडकर ही निलंबित झाली ! पण राज्यातले फर्जी सर्टिफिकेट, शोध मोहीमेची जबाबदारी शासनाने, सांगा कुणाच्या खांद्यावर टाकली ?दिव्यांगाचा दिन साजरा करतांना, हिणवणे व व्यंगावर हसण्या शिवाय, फर्जी दिव्यांग शोध मोहीम चांगली ! निसर्गाने दिव्यांग जन्माला घातले ! बोगस दिव्यांग संख्या कुणी केली?हे पूर्ण करताच भोसीकर यांचे निवासस्थानी पोहंचलो.माळेगावे यांनी मला अलगद उचलून आत हाॅलमध्ये सोप्यावर बसविले.मग दिव्यांग दिनावर अर्धा तास सांगोपांग चर्चा झाली.संजय भोसीकर साहेब यांनी म्हटले की,हार व पुष्पगुच्छ किंवा पुष्पहार न घेणे हा तुमचा स्वाभिमान आहे.भोसीकरजी बोलतांना म्हणाले तुमच्या लेखनाचे वाचन करत असतो.प्रबोधनात्मक लेखन कौशल्यास सदिच्छा एक उत्कृष्ट लेखनी देवून माझ्या काव्य लेखनाचे मनभर कौतुक केले.चहा-पान घेऊन आमच्या भेटीची सांगता झाली .