मनोहरजी धोंडे यांच्या पत्नी वैशालीताई  धोंडे यांचे निधन

कंधार ; प्रतिनिधी

सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख तथा शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष
प्रा मनोहरजी धोंडे  यांच्या  पत्नी (जीवनसाथी)
*सौ. वैशालीताई मनोहरजी धोंडे*
यांचे अल्पशा आजाराने युनायटेड सिग्मा हॉस्पिटल संभाजी नगर (औरंगाबाद) येथे आजाराशी कडवी झुंज देत असतांना आज गुरूवार दि.5 डिसेंबर रोजी पहाटे 1.40 वाजता दुःखद निधन *(शिवैक्य)* झाले आहे.
   त्यांचे *अंत्यदर्शन* आज गुरूवार दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 11ते 3 व *अंत्यविधी संस्कार* आजच  दुपारी 4.00 वाजता प्रा मनोहरजी धोंडे सर यांचे मुळगाव मौजे शेवडी बा. ता. लोहा जि. नांदेड येथे करण्यात येणार आहे.
यांची आप्तेष्ट नातेवाईक, मित्र मंडळी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी नोंद घ्यावी…
   प्रा मनोहर धोंडे परिवाराच्या ह्या दुःखात शिवा संघटना सेवा जनशक्ती पार्टी व सर्व मावळे सहभागी आहोत,

*शिवैक्य.सौ.वैशाली ताई* यांच्या मृतआत्म्यास चिरशांती लाभो
     आणि प्रा मनोहरजी धोंडे सर, त्यांचे कुटुंबीय व शिवा परिवारास या तिव्र दु:खातुन सावरण्याची शक्ती भगवान शिव प्रभु देवो हि इश्वर चरणी नम्र प्रार्थना

*शिवैक्य.सौ.वैशालीताई मनोहर धोंडे* यांना

शिवा संघटना, सेवा जनशक्ती पार्टी तथा समस्त शिवा मावळ्यांच्या वतीने
भावपूर्ण श्रद्धांजली.

🙏🙏🌹🌹 *शोकाकुल * 🌹🌹🙏
              *शिवा कर्मचारी महासंघ परिवार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *