काल लिहीलेल्या विषयांवर अनेकजण उत्तम पध्दतीने व्यक्त झालात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.. तुमचे विषय वाचून त्यावर अभ्यासपूर्ण लिहायचे त्यामुळे माझाही अभ्यास होतो..
तरुण पिढी आणि व्यसनाधीनता आणि त्यावर मार्गदर्शन..
हा विषय सुचवला आहे माझे वाचक सुभाष वाघमारे आणि आनंद सांगलीकर.. मनापासून आभार
या गोष्टीला सुध्दा आपण आपल्या घरापासूनच सुरुवात करणार आहोत आणि आपल्या घरात कोणी व्यसनी नसेल याची काळजी घेणार आहोत.. व्यसन म्हणजे काय ?? .. एकच गोष्ट अतिप्रमाणात वारंवार करणे .. अतिरिक्त सेक्स, अतिडाएट , अतिव्यायाम , दारु . सिगारेट , ड्रग्ज , अगदी चहा / कॉफी , मांसाहाराचा अतिरेक .. अगदी कालचा विषय पॉर्नोग्राफी हे सुध्दा व्यसनच आहे.. हे फक्त तरुण पिढीतच आहे का ?? जर असेल तर ते आलं कुठून ?? कुठलीही गोष्ट अचानक कशी येईल ?? .. तर ती आपल्या घरात , अवतीभवती , सिनेमात अशी कुठेतरी असते.. यातलं कुठलही व्यसन घरात असेल तर आपण आपल्या पाल्याला हे वाईट आहे / करु नकोस हे सांगूच शकत नाही.. म्हणजेच काय कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीने या आणि अशा प्रत्येक व्यसनापासुन दुर राहायला हवं .. यासाठी सुध्दा आपला आपल्या मनावर किती ताबा आहे त्यानुसार आपण कुठल्या गोष्टीला किती जवळ करायचं ते ठरतं.. एक उदाहरण देते, मी जेव्हा अध्यात्मावर लिहीते तेव्हा खुप कमी कमेंट येतात पण जेव्हा लैगिकतेवर लिहीते तेव्हा त्यावर भरभरून कमेंट असतात.. म्हणजेच काय तर आपण भडक गोष्टीकडे जास्त आकर्षित होतो.. आध्यात्मिक नशा आपल्याला नको असते कारण ते हानिकारक नाही पण जिथे दुख आहे किवा हानी आहे हे माहीत असूनही आपण ती नशा करतो.. जिथे नको म्हटलं जातं तिथे लोक मुद्दाम जातात कारण कुतूहल असतं आणि याच कुतुहलाचं रूपांतर व्यसनात होतं..
एक किस्सा सांगते , माझ्या मित्राच्या घरी मी गेले होते .. त्याच्या १९ वर्षाच्या मुलीला वाईन टेस्ट करायची होती.. तो म्हणाला , मी तुला आणून देतो..त्याने वाईनचा ग्लास हातात दिला आणि म्हणाला , बघ पिउन पहिला घोट घेतल्यावर तिने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली , Horrible taste Dad .. पुन्हा कधीही पिणार नाही.. तिला वाईनबद्दल कुतूहल होतं आणि वडील नाही म्हणाले असते तर तिने बाहेर मित्रांसोबत ट्राय केलं असतं.. त्यावेळी तिला जरी आवडली नसती तरीही कदाचित मित्रासाठी पुन्हा प्यायली असती किवा उलटही झालं असतं.. हा आणि असा एखादा प्रयोग यशस्वी होवु शकतो. तेच लैगिकतेच्या बाबतीत आहे , सगळं झाकून , लपून असल्याने मुलांना कुतुहल निर्माण होतं आणि त्यातून पॉर्न , मास्टरबेशन , व्यसनं याची सवय लागते… घरातील परिस्थिती , कुटुंबाशी असलेले नातेसंबंध, एकत्र कुटुंब पध्दती , छंद जोपासणे , उत्तम वाचन , भगवद्गीतासारखे ग्रंथाचा अभ्यास , आपले आदर्श , आपली स्वप्ने , जीवनाचं ध्येय , वैचारिक बैठक , संस्कार अशा अनेक गोष्टी आपल्याला व्यसनापासुन दुर ठेवतात..
मुलं आपलं अनुकरण करतात.. माझ्या माहेरी सासरी एकही माणूस व्यसनी नाही हे अभिमानाने सांगते याचीही अशीच अनेक कारणे आहेत.. पिढ्यानपिढ्या आम्ही हे पहात आलोय त्यामुळे पार्टी , व्यसनं हे सगळं आम्हाला वेळ व्यर्थ जाणाऱ्या गोष्टी वाटतात.. . मी आजपर्यंत चहाची चवही घेतली नाही याचं श्रेय माझ्या आईला जातं कारण तिने लहानपणापासूनच आम्हाला दूध प्यायची सवय लावली.. अलीकडे मुलांना भुक लागली की आई म्हणते ,पर्समधले पैसे घे आणि भेळ खाऊन ये.. पण त्या मुलाला सोबत घेउन त्याला शिकवुन ती घरात खायला करत नाही.. इथेच मुलं बाहेर जातात.. मित्रांना भेटतात.. पार्ट्या करतात .. ड्रिंक करतात कारण पालक तेच करतात.. मुलांना व्यसनी बनवण्यात पालकांचा मोठा वाटा आहे.. आणि बाहेर गेल्यावर संगत… कुठल्याही वाईट गोष्टीपासून दुर राहायचे असेल तर ते वाईट आहे हे समजायला हवं , आणि नंतर ते करू नये म्हणुन मन आपल्या ताब्यात हवं.. मनाने शरीरावर कंट्रोल न करता शरीराने मनावर ताबा मिळवायला हवा.. यासाठी योगासने , प्राणायाम , उत्तम ऐकणे , सतत व्यस्त रहाणे अशा अनेक गोष्टीने आपण व्यसनापासुन दुर राहु शकतो.. मनुष्य जन्माचा मुळ उद्देश समजला कि आपण आपला मौल्यवान वेळ व्यसनांवर वाया घालवणारच नाही..
म्हणुन अध्यात्माची कास धरा..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist
.