हा विषय सुचवलाय माझे वाचक श्रीरंग कुलकर्णी यांनी.. मनापासून कृतज्ञ.. अतिशय उत्तम विषय आणि आताच्या जमान्यात त्रासदायक आणि तितकच हवंहवंसही..
मुळात एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी फक्त मित्रमैत्रीण कि प्रेम कारण दोन्ही नात्यात फरक असल्याने अपेक्षा वेगळ्या असतात आणि त्याचं नंतर ओझं व्हायला लागतं.. मुळात निस्वार्थी प्रेम ही कंसेप्टच नाही .. फक्त भगवंत आणि भक्त यांच्यात असं प्रेम असु शकतं माणसात नाही.. आपला नवरा किवा बायको असताना जेव्हा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडतो हे ठरवुन नक्कीच नसतं .. तसं असतं तर मग आपल्या आवडीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो असतो.. हा नियम लग्नालाही आहे..आपल्या कर्मानुसार योग्य वेळी योग्य व्यक्ती संपर्कात येतात आणि त्याही ठरावीक काळासाठीच असतात .. काहीतरी बिनसलं म्हणुन किवा भांडण न होताही ते आपोआप बाजूला जातात.. कारण हे घडवणारं कोणीतरी आहे.. विधीलिखीत हेच तर आहे.. माझ्याकडून लिहून घेतली गेलेली बियॉन्ड सेक्स ही कादंबरी यावरच आहे म्हणुन लोकांना ती जास्त भावली..
विवाहबाह्य संबंध चुक कि बरोबर यात आता मी शिरत नाही.. ज्यांची आहेत त्यांना गाईड करण्यासाठी हा लेख.. याला कुठलही लॉजिक नाही.. जो प्रेमात आहे तो म्हणतो , काय हरकत असावी.. जो फक्त संसारात आहे तो म्हणतो , यांना कोणी उद्योग सांगितले…प्रेम ही तरल भावना आहे आणि गरज ही त्याची एक बाजु आणि वासना ही त्याची दुसरी बाजू.. गरजा या शारीरिक ,मानसिक , आर्थिक सगळ्या प्रकारच्या असतात आणि त्या सगळ्या नात्यात असतात.. वासना ही फक्त शारीरिक असते आणि त्यातून अपेक्षा येतात आणि अपेक्षा पूर्ण करत असताना त्याचा अतिरेक झाला कि त्याचं ओझं होतं आणि नात्यात कुरबुरी निर्माण होउन ते संपायला सुरुवात होते.. त्यात मनाने कमकुवत असलेला खचून जातो.. मानसिक रुग्ण होतो..
त्याच्या स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो.. ज्याला काहीही फरक पडत नाही तो नवीन मिळेल किवा जणु काही घडलच नाही या अविर्भावात जगतो.. निर्लज्ज म्हणु ना.. किवा तो आधीपासूनच तितका इनव्हॉल्व नसेल किवा त्याचा स्वभावच तसा असेल पण जो मनाने अशक्त असतो , जो खरच मनापासून घरी आणि बाहेर सगळं सेम देउन नातं जपतो त्याला मात्र त्रास होतो.. भावनेच्या भरात माणूस न ओळखता आपण सर्वस्व देउन जातो आणि त्याने अमुक आपल्यासाठी करावं असं वाटत असतं आणि ते झालं नाही कि दुख होतं आणि त्यातुन अनेक घटना घडतात.. सोशल मिडीयावर फोटो / व्हीडीओ शेअर करुन एकमेकांना बदनाम करणे असेल.. त्या व्यक्तीच्या पाठीमागे त्याला वाईट ठरवणं असेल किवा त्याच्या कुटुंबापर्यंत हा सगळा प्रकार घेउन जाणं असेल यात दोन्ही कुटुंब उध्वस्त होतात.. आपण स्वतःला अभ्यासपूर्ण इतकं मजबूत बनवा कि ही व्यक्ती नक्की कशासाठी आपल्याजवळ आहे हे ओळखता यायलाच हवं..
प्रेम आहे कि शरीरसुखासाठीही व्यक्ती जवळ आहे हेही ओळखा.. स्त्रीयांनी याबाबत अधिक जागृक रहा. कधी काही न देउन तुम्ही त्याची परीक्षा घेउ शकता.. त्याची वैचारिक लेव्हल काय आहे ??.. शिक्षण , फॅमिली बॅकग्राउंड , व्यसनं , आणि स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन या सगळ्याचा विचार याही नात्यात असायला हवा.. जेव्हा एखाद्या सोबत आपण काही वेळ घालवतो तो वाया न जाता अविस्मरणीय आणि आनंदीच असायला हवा.. कधीतरी रुसवा फुगवा साहजिकच आहे.. पण सतत फक्त डिमांडच असतील तर समोरची व्यक्ती कंटाळते.. कोणीही या जगात परिपूर्ण नाही.. कमी जास्त काहीना काही असणारच पण स्वतःला काही वेळा बदलताही यायला हवं.. ज्या अपेक्षा समोरच्याकडुन करतो तशा त्याने केल्या तर त्या पूर्ण करायची आपली तयारी हवी..
मुळात हा लेखाचा विषय नाही कारण व्यक्तीगणिक सगळ्या गोष्टी बदलतात.. त्याला अनेक कंगोरे आहेत.. आणि विवाहबाह्य मैत्री म्हणजे मच्युअर त्यामुळे सारासार विचार हा व्हायलाच हवा.. काहीजण म्हणतात , कशाला मित्र मैत्रीण हवेत .. नवराबायकोला मित्र मैत्रीण बनवा.. ते खोटही आहे आणि काही प्रमाणात खरही आहे.. सगळ्यानी एक मान्य करायलाच हवं ते म्हणजे बदल आणि तो नैसर्गिक आहे.. आध्यात्मिक दृष्ट्या नवरा बायकोशिवाय लैगिकसंबंध हा व्यभिचार आहे.. त्याला मान्यताच नाही.. हे माहीत असूनही ते किती जण पाळतात.. मुळात विवाहबाह्य संबंध हे त्याचसाठी जास्त प्रमाणात असतात.. आणि बाहेर दाखवायला त्याला प्रेमाचा मुलामा दिला जातो.. फार कमी मंडळी असतील जवळपास नाहीत म्हणा ना जे फक्त आणि फक्त प्रेम करतात.. प्रेमात शरीराचा संबंध येतोच कुठे ??.. ते तर आत्न्यावर असायला हवं.. ते आत्म्यावर नसतं म्हणुन आपण दुखी असतो म्हणजेच प्रेम करायची आपली पध्दतच चुकते.. फार मोठा गुंतागुंतीचा विषय आहे.. मांडायचा प्रयत्न
केला आहे..( तळटिप.. एकदम शांतता राखा .उद्यापासून २२ तारखेपर्यंत पुणेकर वाचणार आहेत .. १४ ते २२ ..वेळ १० ते 10.. ६५० पुस्तकाचे स्टॉल्स .. आणि त्यात माझ्या प्रकाशकाचाही स्टॉल आहे.. मी तिथे सोमवारी रात्री ७ . ३० ते ९ असणार आहे.. चेतक बुक्स या नावाचे प्रकाशन आहे.. स्थळ.. एफसी कॉलेज ग्राउंड..माझी पुस्तकेही तिथे मिळतील..
ज्यांना मला भेटायचे आहे त्यांनी या आणि सगळ्या स्टॉलवर जाऊन भरपूर पुस्तके खरेदी करुन वाचून त्यातील उत्तम स्वतःमधे उतरवुन स्वतःला समृद्ध करा )
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist