लोहा , कंधार विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी 155 कोटी मंजूर : आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश

कंधार  :- सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे 33 टक्केच्या वर नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाकडून 812 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करावी, असे आवाहन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे केले आहे.

सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यासह कंधार आणि लोहा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. खरीप पिकाला मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदार झाला होता . अशा परिस्थितीत आसमानी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची विनंती केली होती . यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे या पाठपुराव्याला यश आले असून आता कंधार तालुक्यासाठी 73 हजार 650 बाधित शेतकऱ्यांसाठी 71 कोटी 27 लाख रुपये, लोहा तालुक्यासाठी 80 हजार 840 बाधित शेतकऱ्यांसाठी 84 कोटी 40 लाख रुपये, शेतकऱ्यांसाठी 812 कोटी 386 लाख रुपये मंजूर झाले आहेत. दिनांक 01.01.2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यत मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावे असे आवाहन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *