नवभारत साक्षरता कार्यक्रम योजनेत कंधार तालुका विभागात प्रथम ;शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी गटशिक्षणाधिकारी संजय येरमे यांचा केला सत्कार

कंधार ; दिगांबर वाघमारे

नवभारत साक्षरता कार्यक्रम २०२४-२०२५ योजनेत कंधार तालुका जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण विभागात प्रथम आला आहे . त्याबद्दल महाराष्ट्र राज्य पुणे योजना शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी
कंधारचे गटशिक्षणाधिकारी संजय येरमे यांचा नांदेड येथिल योजना कार्यालयात सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हयातील सर्व तालुक्यातून नवभारत साक्षरता कार्यक्रमाची राहिलेली अमलबजावणी तात्काळ करून लाभार्थांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले .

नवभारत साक्षरता कार्यक्रम २०२४-२०२५ व योजना यांचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यासाठी दि १३ डिसेंबर रोजी नांदेड येथिल योजना कार्यालयात महाराष्ट्र राज्य पुणे योजना शिक्षण संचालक डॉ.पालक महेश पालकर यांनी बैठक घेतली.नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यातील गटशिक्षणअधिकारी यांनी आढावा घेतला .सन २०२२-२०२३ पासून पाच वर्षासाठी म्हणजे २०२६-२०२७ या कालावधीमध्ये एनआयएलपी म्हणजे नवभारत साक्षरता कार्यक्रम चालू आहे .असाक्षर व्यक्तींना साक्षर करून अंधकारमय जीवनात ज्ञानरूपी प्रकाश देण्यासाठी सदर एनआयएलपी म्हणजेच नवभारत साक्षर कार्यक्रम योजना चालू आहे .

यामध्ये कंधार तालुक्याचे दोनहजार एकशे ४० असे उद्दिष्ट ठेवले होते पैकी शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे .कंधार तालुका नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रभावीपणे काम करत असल्यामुळे गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांचा आज सत्कार करण्यात आला तसेच अनुक्रमें नंबर मिळाल्या बद्दल लोहा येथील गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे व मुखेड येथील गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरने यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या वेळी नांदेड जिल्हा शिक्षण योजनेचे शिक्षण अधिकारी दिलीप बनसोडे , प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ डॉ.सविता बिरगे ,माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी वडजकर मॅडम तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी योजना माधव शिंगडे यांची उपस्थिती होती .

यावेळी डॉ .महेश पालकर यांनी या योजनेतील सर्व कामे विहीत वेळेत गतीने पूर्ण करून सर्व पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्व शिक्षणाधिकारी , शिक्षण विस्तार अधिकारी , मुख्याध्यापक यांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन यावेळी केले .

या यशाबद्दल शिवकुमार कनोजवार,ओम प्रकाश यरमे ,बी एन केंद्रे ,ज्ञानोबा सठ,डी आर शिंदे ,माधव कांबळे,सरस्वती अंबलवाड ,सौ अंजली कापसे,शिक्षक महासंघाचे भास्कर पाटील कळकेकर ,राजहंस शहापुरे,बसवेश्वर मंगनाळे,दिगांबर वाघमारे,महंमद अनसारोदीन,मंजूर परदेशी, हरीहर चिवडे ,जी टी गुट्टे ,अविनाश कोलगावकर , बि जी फसमले ,संतोष जोशी, दत्ता मोहिते ,संतोष आंबुलकर , आनंद तपासे ,आदींनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *