मुळव्याध, भगंदर, फिशर इत्यादी गुदमार्गाच्या आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, दिनचर्या किंवा लाईफ स्टाईल कसी असावी, काय खावे, किती खावे, केव्हा खावे, किती वेळा खावे, केव्हा झोपावे, केव्हा उठावे, किती वेळ झोपावे, कामाचे स्वरूप कसे असावे, बैठक व्यवसाय आहे का, रात्री जागरण आहे का, प्रवास आहे का विशेषतः मोटार सायकल वर प्रवास आहे का, काही वेसन आहे का इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन व्हावे.
मुळव्याधाचे उपचार केल्या नंतर किंवा ऑपरेशन केल्या नंतर पुन्हा मुळव्याध होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी टाळाव्या किंवा कोणती काळजी घ्यावी या विषयी माहिती सांगितली जाते.
मुळव्याधा विषयचे गैरसमज दूर व्हावेत, जन जागृती व्हावी, मुळव्याधा विषयी परिपूर्ण ज्ञान किंवा माहिती व्हावी, मुळव्याध झाल्यास न लपवता, कोणाला कसे सांगावे किंवा कसे दाखवावे या संकोचित भावनेमुळे किंवा शर्मेमुळे, लाजेमुळे कोणाला ते सांगत नाहीत किंवा दाखवत नाहीत. मुळव्याधा विषयी त्याचे कारणे, लक्षणे, चिकित्सा या विषयी ओपनली किंवा बिनधास्त बोलले जात नाही. त्यामुळे मुळव्याध झाल्यास घरगुती उपचार, गावटी उपचार, जाहिराती वाचून उपचार किंवा कोणाच्या सांगण्यावरून उपचार केला जातो. यामुळे लाक्षणिक फायदा होता. पण त्याठीकानची विकृती किंवा बिघाड हा वाढत जातो व मुळव्याध पुढील अवस्थेत जातो.आम्ही गेल्या २० वर्षा पासून निवघेकर आयुर्वेद हॉस्पिटल द्वारे मुळव्याध, भगंदर, फिशर इत्यादी गुदमार्गाच्या आजाराचे Practice Practice करत आव्होत. दिवसेन-दिवस मुळव्याधीचे रुग्ण वाढत आहेत आणि भविष्यात खाण्यापिण्याच्या सवयी मुळे आणखी प्रमाण वाढणार आहे. दीर्घकाळ मुळव्याध अंगावर काडल्यास तो पुढील अवस्थेत जातो. आणि कॅन्सर सारख्या व्याधी मध्ये रुपांतर होऊ शकते. म्हणून वेळीच काळजी व उपचार घेणे आवश्यक आहे.
डॉ. विश्वंभर पवार
डॉ. सुरेखा वि. पवार
निवघेकर आयुर्वेद हॉस्पिटल
डॉक्टर्स लेन नांदेड
मो. 9881166777