मुखेड: (दादाराव आगलावे)
सध्या सर्वत्र कडाक्याच्या थंडीची लाट चालू आहे. सामाजिक भावनेतून सुप्रभात मित्रमंडळ मुखेड जि.नांदेडच्या वतीने दि.16 डिसेंबर रोजी रात्री १० ते ११ चे दरम्यान भटके, रस्त्यावरील बेवारस, पालीत राहणाऱ्या अत्यंत गरीब गरजू, वृध्द स्त्री-पुरुषांना उबदार ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले .मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून व प्रमुख पुढाकारातून सुप्रभात मित्रमंडळ या परिसरात मागील 34 वर्षांपासून सेवाभावी वृत्तीने कार्य करीत आहे. आजपर्यंत अनेक रक्तदान शिबिरे, योग शिबिरे, वृक्षारोपण, स्मशानभूमी सुशोभीकरण, गुणवंताचे सन्मान, पूरग्रस्तांना मदत , अनेक व्याख्याने आदि सामाजिक, राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यांत सदैव अग्रेसर असते. यासाठी सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार , कार्याध्यक्ष मुखेड भूषण डॉ दिलीप पुंडे , सचिव जीवन कवटिकवार, संघटक अशोक कोत्तावार, नंदकुमार मडगुलवार, उत्तम अण्णा चौधरी, डॉ. एस. एन. कोडगिरे, डॉ. आर. जी. स्वामी, डॉ .पी.बी. सीतानगरे, डॉ. एम.जे. इंगोले, डॉ वीरभद्र हिमगिरे, सूर्यनारायण कवटिकवार, नारायणराव बिलोलीकर, गोपाळ पत्तेवार, पत्रकार दादाराव आगलावे, पत्रकार शिवाजी कोणापुरे, उत्तम भाऊ कुलकर्णी, लक्ष्मीकांत चौधरी, बालाजी वट्टमवार, मनोज जाजू, प्रवीण कवटिकवार, सुर्यकांत कपाळे, दिनेश चौधरी यांच्यासह बालाजी डोणगाये, शंकर चव्हाण, व्यंकट पाटील शिंदे, राम जाधव, बाळू ससाणे, दिगाबर चौलवाड आदिंचे सहकार्य लाभले.