आपण आपला मौल्यवान वेळ खुप ठिकाणी वाया घालवतो.. सोशल मिडीयावर तर नको त्या कमेंट्स करुन एनर्जी , वेळ सगळच वाया जातं.. पुण्यात एफ. सी च्या ग्राउंडवर जवळपास ६५० स्टॉल्सचं मोठे प्रदर्शन भरले आहे.. काल मी तिथे होते.. प्रचंड प्रमाणात सकारात्मक उर्जा असलेली ती जागा जाणवली.. ३/४ तास मोबाईलपासून दुर राहून साहित्यकांनी लाखो विवीध विषय हाताळले आहेत.. साहित्याविना आपल्या आयुष्यात काहीही नाही.. सोशल मिडीयावर नवोदित वाचक विचारतात , आम्ही काय वाचु ??.. त्यावर अनेक जण जुन्या ठरावीक ४/५ पुस्तकांची नावं सुचवतात.. सगळ्याना मला एक सांगायचय चघळुन चोथा झालेले विषय वाचण्यापेक्षा अनेक नवीन विषयांवर लेखकानी लिहीलं आहे ते वाचा..
काही शब्दही आपल्याला माहीत नसतात.. २५ ते ३३ % इतका मोठा डिस्काउंट पण आहे.. लेखक जेव्हा लिहीतो तेव्हा तो खुप वाचत आणि ऐकत असतो त्यामुळे भविष्यात तुम्हालाही साहित्यात योगदान द्यायचे असेल तर भरपूर वाचा आणि श्रवण करुन मनन करा ..घराबाहेर पडलो कि आपल्याला खुप चांगल्या गोष्टी नव्याने कळतात.. गेल्या आठवड्यात LGBTIQ यांचं साहित्य सम्मेलन होतं.. त्यात माझी मुलाखत होती.. आय या शब्दाचा अर्थ मला तिथे गेल्यावर समजला. आय म्हणजे इंटरसेक्स म्हणजेच एखाद्या व्यक्तीला दोन्ही लिंग असतात.. काल माझे एक वाचक मला स्तॉलवर भेटायला आले होते.. ते स्वतः गे आहेत त्यांना त्यांच्यावर पुस्तक लिहायचं आहे .. त्यांच्या बोलण्यातुन मला असंख्य गोष्टी समजल्या.. ऐकून मीही हादरले.. जग खुप वेगळं आहे… एका चौकटीत जगणाऱ्यानो आपल्या आयुष्याचं सोनं करुन घ्या.. एवढे पैसे महिन्याला घरात आणले म्हणजे आपले कर्तव्य संपत नाही तर अनेक लोकांना आपल्याला मदतही करता यायला हवी..
काल प्रदर्शनात ग्रंथ पाहिले आणि जाणवलं , मी आयुष्यात काय केलं ??.. हे इतके ग्रंथ लेखकांनी कधी लिहीले असतील ??.. आपल्याला किती काम करायला हवय.. तिथे जाऊन सगळ्या साहित्यकारांची कृतज्ञता व्यक्त करुन या.. दुसऱ्याची उणीदुणी काढण्यात वेळ अजिबात वाया घालवु नका.. लेखकांना भेटुन लिखाणाबाबत माहिती घ्या.. निरीक्षणातुन खुप गोष्टी शिकता येतात.. बाहेर सुंदर डेकोरेशन केलं आहे त्या कलेचा आनंद घ्या.. सुंदर स्टॅच्यू आहेत ते न्याहाळा.. टॉवर मधे राहून मानसिक रुग्ण होवु नका.. बाहेर बोलायला , जाणून घ्यायला खुप काही आहे.. आपली प्रगती आपल्याच हातात आहे.. आपल्या मुलांना तिथे आवर्जून घेउन जा.. काल मला तिथे मुलं दिसलीच नाहीत.. त्यांना पुस्तकाना स्पर्श करुदेत.. त्याचं महत्व त्यांना समजून सांगा.. एकदा मुलांना वाचनाची आवड लावली कि ते इतर नको असलेल्या गोष्टीपासून दुर रहातील.. पब / बार मधे जाऊन वेळ आणि पैसा वाया घालवण्यापेक्षा कुटुंबासोबत इथे जा..
वाचाल तर जगाल..#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist