*कंधार दि.17 डिसेंबर (प्रतिनिधी)*
सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू असूनू पुरुषासह महिलाही मोठ्या प्रमाणात ऊस तोडणीच्या कामाला आल्या आहेत.थडीमध्ये ऊसतोडणी करणाऱ्या महिला कामगाराना सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हा महिला काग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई संजय भोसीकर यांनी ब्लँकेटचे वाटप करत मायेची ऊब दिली आहे .
कंधार तालुक्यातील पानभोसी येथे ट्वेंटी-वन साखर कारखाना जामगाशिवणी तालुका लोहा येथील टोळ्या ऊस तोडणीसाठी आल्या आहेत
यामध्ये पुरुषांसह महिलाही मोठ्या प्रमाणात आहेत.यावेळी सौ.वर्षाताई भोसीकर यांनी महिला ऊसतोड कामगारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी थंडीपासून : संरक्षण होण्यासाठी ब्लॅकेटचे वाटप केले आहे.
ऊसतोड कामगारांना आपले घरदार सोडून ऊसतोडीसाठी बाहेर गावी जावे लागते.रानावनात थांबावे लागते. यामुळे मुलांच्या शिक्षणाचे देखील नुकसान होत असते.अशा अनेक समस्या यावेळी ऊसतोड महिलांनी सांगितल्या कामगारांच्या मुलांसाठी शाळा सुरू करून शिक्षणाची सोय करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे सौ.वर्षाताई भोसीकर यांनी यावेळी सांगितले.
त्यांच्या या उपक्रमाबद्दल ऊसतोड कामगार महिला भगिनींनी त्यांचे आभार मानले. समाजातील दुर्लक्षित वर्गाकडे सौ. वर्षाताई यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे व समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.यावेळी ऊस तोड कामगार महिला भगिनी व टोळी मुकदम रामेश्वर पवार,रघुनाथ पवार, उपस्तिथ होते.