मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त रचना
स्वातंत्र्यातील गुलामी
सत्तेचाळीसला संपले इंग्रजांचे जुलमी राज्य
सुरू झाले भारतीयांच्या मनातील स्वराज्य
स्वातंत्र्यानंतरही काही भागात होती गुलामगिरी
तेथील राजानी चालविली त्यांची हाराकिरी
त्यापैकी दक्षिणेत हैद्राबाद होते एक संस्थान
सरकारच्या सुचनेला निजाम देत नव्हता मान
तेथे होता कासीम रझवी नावाचा सुल्तान
रझाकारीच्या नावाने लोकांचा करे अपमान
स्वामी रामानंद तीर्थ सर्वांचे पुढारी बनले
गोविंदराव पानसरेसारखे शूरवीर मिळाले
सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते देशाचे
जाणून होते सारे अत्याचार रझाकारी लोकांचे
घरावर तिरंगा फडकवूनी केला लोकांनी विरोध
याच गोष्टीचा निजामला येत होता प्रचंड क्रोध
लोकांच्या एकजुटीने त्यांचा पाडाव केला
एका वर्षांनी निझामातून मराठवाडा मुक्त झाला
- नासा येवतीकर,
- धर्माबाद जि. नांदेड,
- 9423625769