मन्याड खोर्यातील कोहिनुर …. मनकवड्याची वेशभुषा-पेंटर सावळाराम कुरुडे [भाग-३]


एकदा शनिदेव गल्लीतील एमेकर परिवाराच्या निवासस्थानी मोठ्या वाड्या समोर अस्वलवाले दरवेशी आपल्या अस्वलाला घेवून दारावर आले असता.त्यावेळी पेंटर कुरुडे यांनी त्या विचारणा केली.तुमचा पोषाख मला अंगावर घालून अस्वलासोबत फोटो घेवून,कांही वेळा पुरते का होईना….दरवेशी व्हायचे आहे.

त्यावेळी त्यांची आई तेंव्हा त्यांना म्हणाली “बापु, तु काई बी करतोस!”तेंव्हा त्यांनी म्हणटले फक्त मला सोंगा पुरते करायचे आहे..अशा प्रत्येक वेशभुषा त्यांना करणे आवडत.ते अपघातात जखमी होवून जवळपास त्यांचा पुर्नजन्मच झाला म्हणावे लागेल.

त्या अवस्थेत त्यांनी मनाचा तोल ढळू दिला नाही.आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीवर त्यावर मात करुन आजही ते नित्याने दररोज व्यायाम नचुकता करतात.म्हणुन त्यांचे शरीर आजही ७० तही सुदृढ आहे.१९५२ चा जन्म आहे.

कंधार शहरात व पंचक्रोशित दुकानाची व प्रतिष्ठानाची दर्शनिय नावाची पाटी त्यांच्या कलेचे देण आहे.मी शालेय जीवनात श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयात शिकत असताना.शाळेत येता-जाता मला दुकानांची बोर्ड वाचण्याचा छंद होता.त्यावेळी बघायचो तेंव्हा जवळपास प्रत्येक बोर्डवर पेंटर कुरुडे हेच नाव असायचे.

सावळाराम पेंटर

कंधारच्या बाजारपेठेत भांड्यांचे प्रसिध्द व्यापारी उध्दव बाबाराव मांगुळकर हा बोर्ड वाचला.त्यावेळी इयत्ता आठवीत होतो.घरी जावून जुन्या स्केच पेना काढून त्यात पाण्याचे थेंब टाकुन उध्दव बाबाराव मांगुळकर भांडी दुकान कंधार असे लिहून ज्या ठिकाणी कुरुडे नाव होते तेथे एमेकर असे नाव टाकले.

त्या पासून मला पेंटींगचा छंद जडला.एका वर्षी बहाद्दरपुरा व कंधार या दोन्हीही ठिकाणी गणेशोत्सवात मनकवडे यांची वेशभुषा करण्याचे ठरले.त्यावेळी त्यांच्या जोडीला माझे जिवलग मित्र क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरीतील मेहनती,मीतभाषी हरहुन्नरी अॅड.प्रकाशराव डोम्पले हे कलावंत आले.

मग काय दोन कलावंताची अदाकारी म्हणजे सोने पे सुहागाच पेंटर यांचे कलादालन नागोबा मंदिराजवळ होते.त्या कलादालनात दोन्ही कलावंताची बैठक व्हायची.त्या बैठकित त्या दोघांनी मनकवड्याची हातवारेची भाषा शिकली.

ते दोघांनाही सहज जमले.जवळपास एक महिना सराव करुन व्यसायिक मनकवड्या सारखी वेशभुषा आणि आर्थिक भेट देणार्यांची ते हावभाव करुन ओळखू लागले.त्यामुळे कंधारकरांना कुतुहल वाटू लागले.

कंधार शहरात दोन-चार तास झाल्या नंतर बहाद्दरपुरा नगरीतही त्यांची कला गावकर्यांना पाहता आली.त्यांनी हा शौक केवळ अर्थार्जनासाठी नव्हे फक्त मनोरंजनासाठी केला.दरवर्षी गणेशोत्सवाचे आकर्षण असायचे!पण ते राजकारणा पासुन राहिले.त्यांनी आपल्या कर्तव्याला नेहमीच प्राधान्य देत असत.

राजकिय पक्ष विरहित त्यांनी भुमिका ठेवली.त्यांनी समाजकारण जीवनभर केले.असा कलावंताची कला सध्याच्या तरुणपिढीस परिचीत व्हावी यासाठी ही लेखांची मालिका प्रकाशित करता आली.दर आषढी एकादशीस पंढरीच्या पांडुरंगाचे पोट्रेट आपल्या कलेतुन साकालेले छायाचित्राचे विधीवत मान्यवरांच्या समर्थ हस्ते पुजा करुन आषाढी एकादशी कंधार नगरीत आपल्या कलादालनाच्या न चुकता करताता.

मैत्रीचा गोतवाळा हे त्यांच्या जीवनाचा गाभा आहे.आमच्या एमेकर परिवाराच्या जुन्या वाड्यापुढे पंचमी सणाच्या निमित्य भुलईच्या मध्यभागी श्रीयाळ शेठ राजाची छोटी चिकन मातीची मुर्ती अनेक वर्ष त्यांनी साकरली.

माझ्या लहान पणी ते साकारत.एका वर्षी मी इयत्ता नववी वर्गात असतांना पेंटर गणेशोत्सवाचा घरगुती गणपती लाल मातीचा ओसरीवर करत होते.मी मात्र त्यांना न सांगता थोडे बाजुला लपुन गणपतीची लाल मातीतली गणपती बाप्पाची छोटी मुर्ती बनवली.

अन् लगेच त्यांच्या समोर नेताच त्यांना अश्चर्याचा धक्का बसला.तेंव्हा पासुन दरवर्षी मी छोटी मातीची मुर्ती करु लागलो.बहाद्दरपुरा नगरीत 1959 पासून शिवजयंती व म.बसवेश्वर जयंती आणि व्दादशभुजा देवी यात्रा महोत्सवात गावातल्या चौकातला शिवरायांचा पुतळा व व्दादशभुजादेवीची मुर्तीला रंगकाम त्यांच्या कल्पकतेनेच..

ज्या वेळी मन्याड नदीच्या पात्रात डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या संकल्पनेतून संत गुरु नानकदेवजी हुजूर साहेब गुरुव्दारांचे नाव नदी पात्रात पश्चिम दिशेस असलेल्या विहिरीवर पेंटर मोठे नाव काढत होते.दररोज दोन तिन वेळा डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब पाहण्यासाठी येत असत.

एकदा दोन-तिनच्या दरम्यान सहज पाहण्यासाठी आले.त्यांनी म्हणटले.पेंटर साहेबाला कांही फराळ-पाणी आहे की,म्हणाले…लगेच तेथे मदतीला असलेल्यानां मुरमुर्यांचा चिवडा तयार करुन आणा.असे सुचीत केले.

त्या विहिरी जवळ नदीपात्रात गावातील एक चिता जळत होती.त्या चितेच्या 30/35 फुटावर डाॅ.भाई साहेबा सहित सर्वांनी बसून तो चिवडा खाल्ला…ही घटना अवर्जून लिहावी वाटली.अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम केले.

सावळाराम पेंटर

मनकवड्याची वेशभुषा केली.त्यांच्या कलादालनाच्या पुढे पेंटर कुरुडे,अॅड.प्रा.डाॅ.प्रकाश डोम्पले सर,अॅड.गंगाधर बनसोडे सर. छायाचित्रकार चंद्रकांत फुके सर,इंजिनिअर वारद सर,गणेशराव अमिलकंठवार आदी यांचे छायाचित्र……..क्रमश:

dattatrya yemekar
dattatrya yemekar

लेखन ; दत्तात्रय येमेकर ,क्रांती भवन बहाद्दरपूरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *