११ व्या समता संदेश पदयात्रेचे प्रस्थान

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )

येथून जवळच असलेल्या मौजे कुरुळा ता कंधार येथून आज बुधवार दि 25 डिसें 24 रोजी सकाळी ठीक 11 00 वाजता समता संदेश पदयात्रा कुरुळा ते बसवकल्याण प्रस्थान आहे. उदघाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की 12 व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी एका होलार जातीतील शरण ऊरिलिंग पेद्दी नावाच्या व्यक्तीस जंगम दिक्षा देऊन लिंगायत मठाचा मठाधिपती बनवले होते. एका दलित व्यक्तीला माणूस म्हणून समानतेचा अधिकार तर दिलाच, पण त्या दलित व्यक्तीला त्याची योग्यता पाहून महात्मा बसवेश्वरांनी त्यास जंगम दिक्षा देऊन कंधार येथील लिंगायत मठाचा मठाधिपती बनवले.

दरम्यान समता संदेश पदयात्रेचे उद्घाटन डॉ सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर आणि डॉ शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी श्री हणमंत आप्पा औरादे, उदगीर असणार आहेत. मा आ गंगाधर पटणे सत्कारमूर्ती आहेत. स्वागताध्यक्ष श्री भगवान चिवडे,कुरुळा आहेत.

सकाळी ठीक 11 00 वाजता राजयोग गार्डन मंगल कार्यालय,दैठना रोड कुरुळा येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आणि समता संदेश पदयात्रेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *