काय गं हे झिपरे In Advance Merry christmas… उद्याचं सेलीब्रेशन आजच करुयात का ??.. क्रिसमस साजरा करायला ख्रिश्चन असायची काय गरज ??.. प्रेमात असलो कि बस झालं ना.. तुम्ही म्हणाल , इथे प्रेमाचा काय संबंध ??.. सगळीकडे प्रेमाचाच संबंध असतो भाऊ.. त्याच्याइतकं सुंदर या जगात काहीही नाही..
त्याने तिच्या डोक्यात एक पिल्लु सोडून दिलं आणि तो त्याच्या कामात राहिला.. त्या दिवशी कॉफीची तगमग तुम्ही वाचली असेलच.. आता आज याने काय प्लॅन केला असेल याचा विचार ती करु लागली.. दोघांच्या आवडीचं नक्कीच काहीतरी असेल हे तिला माहीत होतं.. न रहावुन तिने मेसेज केला , काय प्लॅन आहे सांग नारे ??.. म्हणजे त्यानुसार ड्रेस सिलेक्ट करेन.. काहीतरी हिंट दे ना.. तो म्हणाला , स्वर्गात जायचय.. म्हणजे साडी हवीच असं तिने मनोमन ठरवलं आणि मेसेज केला कुठल्या रंगाची नेसु सांग ना.. तुझ्यावर तर सगळेच रंग खुलून दिसतात रादर रंगाना तु रंग चढवतेस.. असं म्हणुन तो पुन्हा कामात राहिला आणि ४ वाजता मेसेज केला ‘ ये श्याम , श्याम को क्यु आती है ??.. आज वेळ का जात नाही ??..
त्याने तिच्यासाठी स्वर्गीयसुखाचा प्लॅन केला होता.. यात कुठेही शारीरिक सुख नव्हते .. फुलातील मधावर त्या भुंग्याचा
अधिकार होता.. भुंगा त्या मधाभोवती रुंजी घालत होता आणि मधाला त्या भुंग्याची आस लागली होती.. अनेक भुंगे त्या फुलापाशी येउ लागले तरीही त्या भुंग्याची सेलीब्रेशनची पध्दत वेगळीच होती.. मध चाखताना कुठेही फुलाला त्रास व्हायला नको .. तिच्या कवेत त्याला विरघळायचं होतं आणि श्वासात भरुन रहायचं होतं.. स्वर्गीय सुख म्हणजे समर्पण आणि त्याची अनुभुती घेतानाचा क्षण म्हणजेच स्वर्ग.. पृथ्वीवर अनेकदा त्यांनी स्वर्ग निर्माण केलाय त्याचवेळी इतरांनी त्याचा बाजार मांडला.. एक ती आणि दुसरीकडे वेश्या . खरं तर दोन्ही स्त्रीयाच पण एकीला तात्कळत एखाद्या वखवखलेल्या आणि तहानलेल्या वाटसरुची वाट पहावी लागली असेल आणि दुसरीकडे दुसऱ्या स्त्रीला स्वर्ग दिसला असेल.. किती विरोधाभास आहे ना हा.. मन तेच , भावना त्याच , शरीर तेच , पण एक सुख घेउन आनंदाने आलिशान महालात पहुडते आणि दुसरी दुसऱ्या दिवशीच्या भाकरीसाठी तडफड करते.. इथे कर्माचा संबंध असला तरीही भावभावनांच्या खेळात स्त्रीत्वाचा चुराडा होतो हे मात्र त्रिकालाबाधित सत्य.. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सुंदरीने काय पाप केलं होतं माहित नाही.. जो तो येतो आणि शरीराचा सौदा करु लागतो आणि पैसे जास्त म्हणुन निघून जातो पण तिच्या मनाचा विचार कोण करणार ??.. तिच्याभोवतीच्या भुंग्याना तिच्यातील मध कडु का लागतो ??.. दैवाचा सारा खेळच न्यारा.. स्वर्गात जायचा अधिकार दोघीना नाही म्हणुन नरकाची निर्मिती झाली असावी ..पण भुंग्यानी ठरवलं तर नरकाचा स्वर्ग ते सहज करु शकतात.. फक्त गरज आहे मानसिकता बदलण्याची.. वेश्या ही सुध्दा निसर्गाची सुंदर कलाकृती आहे कारण ती स्त्री आहे..तेही एक सुंदर शिल्प आहे.. तुमच्या शरीराची भुक भागवताना
तिचीही भाकरीची भुक आहे हे विसरु नका.. तिच्यातही परमात्मा आहे.. अशा अनेक संध्याकाळ ह्या जीवघेण्या असतील तितक्याच सुखदही असतील.. पण मनात काहूर माजवून गेली ती संध्याकाळ आयुष्यभर आपल्या मनपटलावर कोरली जाते..
सोच बदलो..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist