कंधार/ प्रतिनिधी
मा.नां.श्री.दिलीपराव देशमुख आणि मा.नां.श्री.बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २८ व २९ डिसेंबर २०२४ रोजी लातूर येथे होणा-या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनास (वार्षिक अधिवेशन) अधिवेशनासाठी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे माजी सचिव मोतिभाऊ केंद्रे यांनी केले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन (वार्षिक अधिवेशन) लातूर शहरातील औसा रोड येथील थोरमोटे लॉन्स येथे दिनांक २८ व २९ डिसेंबर २०२४ रोजी प्रमुख उपस्थिती मा.नां.दादा भुसे आणि मा.नां.डांँ.पंकजभाऊ भोयर व मा वसंत पुरके, मा.बाबुराव जाधव ,मा.हणुमंत साखरे प्रमुख पाहुणे मा.खा.डांँ.शिवाजी काळगे ,मा.खा.ओमराजे निंबाळकर,मा.आ.अमित देशमुख,मा.आ. संभाजीराव पाटील, मा.आ. संजय बनसोडे,मा.आ.विक्रम काळे,मा.आ. अभिमन्यु मा.आ.रमेशआप्पा कराड ,मा.आ.किशोर दराडे ,मा.आ. जयंत असगावकर ,मा.आ.सतीश चव्हाण,मा.आ.किरण सरनाईक,मा.धिरज देशमुख,मा.सुरज माडंरे मा.सुधाकर तेलंग ,मा.डांँ.गणपतराव मोरे , रावसाहेब आवारी अदिसह वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या अधिवेशनात तज्ञाची व्याख्याने व विविध विषयावर प्रश्नावर शोधनिबंध सादर केले जाणार आहेत.
तरी अधिवेशनासाठी या नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुख्याध्यापक / प्राचार्य बंधू- भगिनींनी उपस्थित राहून शासन स्तरावर प्रलंबित विविध शैक्षणिक प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मुख्याध्यापक संघटनेची एकजूट दाखवावी असे आवाहन अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे माजी सचिव मोतिभाऊ केंद्रे यांनी केले आहे.