मुंबई : मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विद्यमान कार्याध्यक्ष, दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. .मराठी पत्रकार परिषदेने एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे बिनविरोध निवडीची घोषणा केली आहे.
दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गेल्या जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यकारिणीची मुदत संपल्यानंतर नूतन अध्यक्ष निवडीसाठी परिषदेचे निरिक्षक, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी दोन वेळा नांदेडला भेट देऊन सर्व वरिष्ठ पदाधिकारी तसेच सदस्यांशी चर्चा केली आहे.वार्ताहर ते कार्यकारी संपादक असा पत्रकारितेतील प्रवास असलेल्या संतोष पांडागळे यांची नियुक्ती .मराठी पत्रकार परिषदेने केली आहे. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन परिषदेशी विचारविनिमय करून आपली कार्यकारिणी तयार करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मावळते अध्यक्ष गोवर्धन बियाणी आणि त्यांच्या टीमने आपल्या कार्यकाळात नांदेड जिल्हयात उल्लेखनीय कार्य करून परिषदेची चळवळ गतीमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता संतोष पांडागळे टीमनेही परिषेदेच्या चळवळीला आणखी स्पीड देत ग्रामीण वार्ताहर ,पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची नियुक्ती झाल्याने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, मराठवाडा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, चिटणीस सचिन शिवशेट्टे, रवी उबाळे,विजय जोशी,चारुदत्त चौधरी,प्रदीप नागापुरकर,गोवर्धन बियाणी यांच्यासह पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीच्या शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.