शालेय समिती,शिक्षक व विद्यार्थ्यांच्या लोकसहभाग.
मुखेड: (दादाराव आगलावे)
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त बालीका दिनाचे अवचित्य साधून मुखेड शहरातील पिएमश्री,आदर्श शाळा, जिल्हा परिषद हायस्कूल (मुलींचे) मुखेड या प्रशालेत शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व पालक यांच्या लोकसहभागातुन विद्यार्थ्यांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा त्यांना शुद्ध पाणी मिळावे या हेतुने वाॅटर फिल्टर मशीनचे प्लाँट बसवण्यात आले असुन सदर मशीनचे उदघाटन मुखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सि.एल.रामोड, सहाय्यक गटविकास अधिकारी धनाजी धर्मेकर, गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे यांच्या हस्ते पुजनाने, श्रीफळ फोडुन, रिबीन कापून करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख हे होते तर उदघाटक म्हणुन गटविकास अधिकारी सि. एल. रामोड, प्रमुख अतिथी गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे, सहाय्यक गटविकास अधिकारी धनाजी धर्मेकर, केंद्रप्रमुख उत्तम चव्हान, मुख्याध्यापक डी. जे. कांबळे, सांस्कृतिक विभागप्रमुख दिलीपराव देवकांबळे, शिक्षक नेते दिपक लोहबंदे, शंकरराव पोतदार, गजानन कवटीकवार, दत्तात्रय चौधरी, प्रदीप शकंरवार, वेणूताई रॅपनवाड सह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाॅटर फिल्टर मशीनचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर उपस्थित सर्वांनी शुद्ध पाण्याची चव चाखून पाणी फिल्टर मशीनचे उदघाटन झाल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त स्वतःच्या हस्तक्षरात तयार केलेल्या भिंतिपत्रकाचे उदघाटन बिईओ कैलास होनधरणे, धनाजी धर्मेकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमांचे मान्यवरांनी कौतुक करून अभिनंदन केले. फुले यांच्या जयंतीनिमीत्त मोठ्या संख्येने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करुन शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पर्येवेक्षक दिलीपराव देवकांबळे यांनी केले तर प्रस्ताविक मुख्याध्यापक डी.जे कांबळे यांनी केले. उपस्थितांचे आभार सहशिक्षक कल्याण इंगळे यांनी मानले. याप्रसंगी मान्यवरांसह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिएमश्री जि.प.मुलींचे हायस्कुलचा परिसर, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शालेय ग्रंथालयाचा कार्यक्षम वापर, विद्यार्थ्यांची बँक, प्रोजेक्टरद्वारे काँम्पुटरवर शिकवणी, विविध शैक्षणिक उपक्रमाबाबत गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.