दर्पण दिनानिमीत्त मुखेड पत्रकार संघाचे ३ दिवस विविध उपक्रम.
मुखेड: (दादाराव आगलावे)
वार्ताहर हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या वार्ताहराने आहार-विहारासोबत आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे आपले आरोग्य सुदृढ राहिले, स्वास्थ चांगले राहिले तरच अधिक क्षमतेने सामजिक काम करण्यास आपणास मदत होणार आहे. दिवसागानिक आजाराचे प्रकार, लक्षणे बदलत आहेत, विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे, व्हायरस बदलून येत आहेत,आजार लपवल्याने सुद्धा आजाा वाढतो आहे,आजाराचे लक्षणे जाणवल्यास,वेळीच आजाराचे निदान झाल्यास त्यावर योग्य उपचार करण्यात येतो आजारावर नियंत्रण ठेवता येते त्यामुळे सर्वांनी शारीरिक तपासणी नियमित करणे ही काळाची गरज आहे असे मत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष टाकसाळे यांनी दि.४ जानेवारी रोजी उपजिल्हा रुग्णालयात केले.
दर्पण दीनानिमित्त अ.भा. मराठी पत्रकार परिषद सलग्णीत मुखेड तालुका मराठी पत्रकार संघ, उपजिल्हा रुग्णालय मुखेड, आय.एम.ए.संघटना व वैद्यकीय संस्थेच्या वतीने वार्ताहरांची आरोग्य तपासणी शिबिर उपजिल्हा रुग्णालयात पार पडले यावेळी ते अध्यक्ष समारोप करताना बोलत होते बोलत होते.
पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध सर्पदंश चिकित्सक्तता डब्ल्यूएचओ चे सदस्य मुखेड भुषण डॉ. दिलीप पुंडे, आयएमएचे अध्यक्ष डॉ.अशोक कौरवार, डॉ. व्यंकटराव सुभेदार भोसले, डॉ. कैलास पाटील चांडोळकर, डॉ श्रीहरी बुडगेमवार, डॉ पांडुरंग श्रीरामे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डॉ.दिलीप पुंडे बोलताना म्हणाले की, सुदृढ आरोग्य हे यशस्वी जिंवंनाची गुरुकिल्ली आहे. समाज घडविण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करतात सर्व घटकातील नागरिकांचे समस्या सोडवण्यासाठी पत्रकार अहोरात्र मेहनत करत असतात कामाच्या ओघात झोप,आहाराकडे दुर्लक्ष होते. सर्व क्षेत्रासह पत्रकारिता क्षेत्रात वाढत्या स्पर्धा बातम्या देण्यासाठी साकारलेली भूमिका जोखीम यातून तानतणाव वाढत आहे त्यामुळे अनेक व्याधी जडण्याचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह, रक्तदाब, वाढीव कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले आहे. पत्रकाराने स्वतःसह आपल्या कुटुंबाची परिवाराचे आरोग्याची काळजी घ्यावी. नियमित आरोग्य तपासणी करवून घावे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आरोग्य विमा कवच काढुन घ्यावे, दिवसागनिक मोठ्या कॉर्पोरेट आधुनिक रुग्णालयात आजार वरील उपचार महागले आहेत. आरोग्य विमा कवच काळाची गरज झाल्याचे मत व्यक्त केले आहे.
प्रसिद्ध -हदयरोतज्ञ डॉ.अशोक कौरवार यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, पत्रकारांनी आपल्यासह आपल्या सर्व परिवाराचीही आरोग्याची काळजी घेण्याचे आपल्या मनोगतातुन आवाहन केले. आयोजीत आरोग्य शिबीरात डॉ.दिलीपराव पुंडे, वैद्यकीय अधिक्षक डाॅ.संतोष टाकसाळे, -हदयरोगतज्ञ डॉ. अशोक कौरवार, डॉ.कैलास चांडोळकर, डॉ.व्यंकटराव सुभेदार, डॉ. श्रीहरी बुडगेमवार, डॉ.पांडुरंग श्रीरामे, डॉ.यु.आर गायकवाड, डॉ.बी.एस गरुडकर, डॉ .एच. एस. मेकेवाड, डॉ.मुकुल गोपुलवाड, डॉ. बी. आदमपुरकर, डॉ. वर्षा कोरडे, डॉ. शेटवाड, डॉ. जुनेद शेख, डॉ. अंजली ढवळे यांच्यासह आयएमए, वैध्यकीय संस्थेचे पदाधिकारी तसेच उपजिल्हा रूग्णालयातील तज्ञ डाॅक्टरांच्या मार्फत पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रस्ताविक मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेताब शेख यांनी केले तर सचिव राजेश बंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी डाॅक्टर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेताब शेख, सचिव राजेश बंडे, जेष्ठ पत्रकार यशवंत बोडके, जिल्हा संघटक एडवोकेट संदीप कामशेट्टे, दादाराव आगलावे, अॅड आशिष कुलकर्णी, संजय कांबळे, दत्तात्रय कांबळे, नामदेव श्रिमंगले, रामदास पाटील, जैनोदीन पटेल,जगदीश जोगदंड, विठ्ठलराव पाटील, राजु रोडगे, गणेश अंबेकर यांनी परिश्रम घेतले.
धन्वतंरी क्लिनिकल लॅबच्या वतीने मोफत तपासणी…
धन्वंतरी लॅब चे संचालक गजानन बंडे यांनी धन्वतंरी क्लिनिकल लॅबच्या माध्यमातून पत्रकारांचे शुगर, मधुमेह, सिबीसी, कॉलेस्ट्रॉल, लिव्हर किडणी, थायरॉईड, हाडाचे कॅल्शिअम सह इतर रक्ताच्या चाचणी मोफत करुन देवुन दर्पण दिनानिमीत्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.पत्रकारांच्या आरोग्यासंदर्भात बंडे यांनी मोफत रक्ताच्या विविध तपासण्या केल्याबद्दल पत्रकार संघाचे अध्यक्ष महेताब शेख यांनी आभार मानले.