कंधार ; प्रतिनिधी
महात्मा फुले प्राथमिक शाळा व विद्यालय संभाजीनगर नवामोंढा कंधार या शाळेची एकदिवशीय शैक्षणिक सहल सहस्त्रकुंड धबधबा इस्लापूर,रेणूका माता,दत्तगड,अनुसया माता माहुर येथे गेली होती.सदरील शैक्षणिक सहलीचे नियोजन योग्य प्रकारे करण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थांनी भौगोलिक व धार्मिक स्थळांना भेटी देत वनभोजनाचा आस्वाद घेतला .
दरवर्षी नववर्ष व प्रजासत्ताक दिनानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळा विद्यालयात करण्यात येते.त्याचाच भाग म्हणून कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळा व विद्यालय संभाजीनगर नवामोंढा कंधार या शाळेच्या वतीने शैक्षणिक सहलीचे आयोजन यावर्षी दि.३ जानेवारी २०२५ रोजी सहस्त्रकुंड धबधबा इस्लापूर,या भौगोलीकदृष्ट्या महत्वाच्या स्थळाची माहीती घेतली व माहूर येथिल रेणुकामाता मंदीर,दत्तगड,अनुसया माता या धार्मिक स्थळाचे दर्शन घेतले.
संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डी एन केंद्रे साहेब व सचिव चेतनभाऊ केंद्रे साहेब यांच्या परवानगीने महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुखाध्यापक वाघमारे डी.जी.व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक जे.जी. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे नियोजन करण्यात आले होते. शाळेचे शिक्षक राजू केंद्रे (सहल प्रमुख ) ,सौ. कागणे यु एम,आनंदा आगलावे , माणिक बोरकर,चंद्रकला तेलंग, गिरजाबाई हाकदळे,तसेच महात्मा फुले विद्यालय नवामोंढा कंधार शाळेचे शिक्षक एच के केंद्रे,जि टी गुट्टे,जाधव सी बी, फिरदोस शेख , बालाजी मुंडे ,वी डी चव्हाण, परमेश्वर कागणे , जुनेद शेख ,सेवक इबू केंद्रे,आदीसह विद्यार्थी उपस्थित होते .