विद्वत्तेचा महामेरू : आचार्य बाळशास्त्री जांभेकर* 6 जानेवारी पत्रकार दिन विशेष

 

 

वृत्तपत्र हे समाजात जाणीव जागृती करीत असतात.लहानांपासून तर थोरापर्यंत सर्वांना आवश्यक असतात. विद्यार्थी जीवनामध्ये स्पर्धा परीक्षा तसेच महत्त्वाच्या घडामोडी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणजे वृत्तपत्र होय. स्वातंत्र्याच्या अगोदर वृत्तपत्रे हे समाजाचे जीव की प्राण होते.कोणत्या भागात कोठे काय? घटना घडल्या यांची इतिवृत्त वृत्तपत्रातून प्रसारित केले जात होते म्हणूनच वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा खांब मानला जातो.मराठी वृत्तपत्राचे जनक,आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरू झाले.

तो दिवस भारतात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. देशातील पहिले अधिव्याख्याते,म्हणून सर्वांना परिचित असलेले,राष्ट्र जागृतीचे कार्य करणारे,मराठी, बंगाली,इंग्रजी, हिंदी, कानडी, गुजराती, ग्रीक, फारशी अशा दहा भाषेवर प्रभुत्व गाजवणारे, इतिहासकार,भूगोलतज्ञ,राष्ट्रनिर्माते, समाज सुधारक ,विचारवंत यांच्या कार्याला प्रणाम.आज पत्रकारिता कशी असावी? याबद्दल दोन शब्द..
पत्रकारांनी प्रत्यक्ष कृतीतून समाज प्रबोधन करावे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे.सजग पत्रकारिता असावी.व्यक्ती कोणत्याही जातीचा,धर्माचा,पंथाचा असो कोणताही मतभेद न करता सरळ सरळ निर्भीडपणे पत्रकारिता करावी. आधुनिक समाजाचे डोळे म्हणजे पत्रकारिता होय. पत्रकारांनी निपक्ष:पातीपणे लेखन करावे. आपले लेखनीची धार बोथट होऊ देऊ नये.

आपली प्रतिमा नेहमी स्वच्छ ठेवावी.
पत्रकारांनी होकायंत्राची भूमिका समाजामध्ये पार पाडावी. सामाजिक बांधिलकीतून कार्य करावे. सत्याच्या बाजूने नेहमी उभे राहावे.शेवटी सत्य हे सत्य असते.सत्यमेव जयते सत्याचाच विजय असतो
लबाडाचं आयुष्य थोडे काळ टिकते, चिरकाल टिकत नाही. म्हणून पत्रकारांनी चिरकाल टिकणाऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. समाजाचे उद्बोधन करावे. संस्कृती, विकृती यातून व्यक्तीच्या प्रवृत्ती कशा आहेत. ते समाजाला दाखवून द्यावे. निकोप निरोगी समाज तयार झाला पाहिजे. यासाठी आपला वेळ द्यावा .समाजात होणारा अन्याय,दुराचार, अत्याचार
दहशतवाद,नक्षलवाद ,अनैतिक संबंध यांचा पर्दाफास करावा. समाजामध्ये असलेले मोठे व्यक्तिमत्व परंतु त्यांच्याकडून सुद्धा अनेक चुका होतात. त्या चुका पोटात न घालता बाहेर आणाव्यात. सर्वधर्मसमभावाची जपणूक करावी. आपला जवळचा नातेवाईक, मित्र, दोस्त अशी विशेषणे लावून कोणालाही पाठीशी घालू नये. पीडीत.शोषित महिला,बालके यांच्या वर झालेले अन्याय,अत्याचार हे लेखणीतून समाजासमोर आणावे. नवमतवादी समाज निर्माण करावा. मी विशिष्ट पक्षाचा आहे.म्हणून पक्षाचा चष्मा घालून पाहू नये.

कोणाच्या दडपणाखाली, दहशतीखाली वावरू नये.ज्या ठिकाणी जी घटना जशी घडली तसाच वृतांत त्यांनी समाजा समोर मांडावा. वृत्तपत्राचा खप वाढविण्या साठी स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी कोणतीही चुकीची पावले उचलू नयेत. 1990 नंतर पत्रकारितेमध्ये बराच बदल झाला. वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकारीता आल्या. त्यातून सुद्धा आपली प्रतिमा स्वच्छ राहण्यासाठी दूरदृष्टीने सर्व व्यवहार करावेत. देशाचे भवितव्य पत्रकारांनी उज्वल बनवावे. ज्यांना आपण राष्ट्रजागृतीचे अग्रदूत,
मराठी पत्रकारितेचे जनक, विद्वत्तेचे महामेरू कितीतरी विशेषण आपण त्यांना लावतो.त्या व्यक्तीच्या सामाजिक,शैक्षणिक कार्याला आपल्या हातून गालबोट लागणार नाही.याची काळजी घ्यावी.

तेव्हाच समाज सुधारणार, समाजातील सर्वच व्यक्ती वाईट नाहीत. पत्रकारिता हे लोक शिक्षणाचे व समाज शिक्षणाचे एक उत्कृष्ट माध्यम आहे.शेती आणि मातीवर नेहमी पत्रकारांनी प्रेम करावं. बुरसटलेले विचार -आचार, वाईट रूढी परंपरा, वेडगळसमजुती या बाजूला सारून आधुनिकतेची कास धरावी. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये जास्तीत जास्त रुजवला जावा. सर्व नैतिक मूल्याची जोपासना व्हावी, त्यामुळे समाज प्रगल्भ व्हायला उशीर लागणार नाही.

अशी उद्बोधन करणारी पत्रकारिता असावी. गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि निष्पाप लोक सुटले पाहिजेत.याची जाणीव पत्रकार बंधूना असावी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचार व तत्वानुसार आजच्या पत्रकारांनी पत्रकारिता करावी. पत्रकारावर होणारे भ्याड हल्ले यांना न जुमानता सर्व पत्रकार बंधूनी एकत्रित येऊन समाजाचे प्रबोधन करावे. आणि समाजहित साधावे.
घडलेल्या घटनांच्या शहानिशा करून बातम्या द्याव्यात.इंग्रजांचे राज्य का आले ?आणि आपले राज्य का गेले? या गोष्टीवरून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे आपल्याला कुशाग्र बुद्धिमत्ता कळते म्हणून त्यांच्या विचारसरणीला कुठेही छेद न जाता सर्व पत्रकार बंधूंनी आपली पत्रकारिता स्वच्छ आरशासारखी करावी.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन ..आज मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व संपादक, पत्रकार बंधू,भगिनी सर्वांना विठू माऊली प्रतिष्ठान खेैरकावाडी यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा

*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *