(कंधार ; दिगांबर वाघमारे )
कंधार येथिल युवा पत्रकार तथा दैनिक प्रजावाणीचे पत्रकार योगेंद्रसिंह ठाकुर यांना नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते स्व.माधव आंबुलगेकर युवा पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला .
मीमांसा फाऊंडेशन , दैनिक समिक्षा , तसेच मंथन क्रिएटिव्ह ग्रुप आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनाचे औचित्य साधून पत्रकारिता पुरस्कार २०२५ चे वितरण सोहळ्याचे आयोजन व्हीआयपी रेस्ट हाऊस सभागृह नांदेड येथे दर्पण दिनाच्या पूर्वसंध्येला ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले होते .
या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य हेमंत पाटील ,नांदेड खासदार प्रा रविंद्र चव्हाण ,हदगाव चे आमदार बाबुराव कदम कोहळीकर , नांदेड उत्तर आमदार बालाजी कल्याणकर , नांदेड दक्षिण आमदार आनंदराव बोढारकर , नांदेड खासदार प्रा रविंद्र चव्हाण , हिंदुस्थान टाईम्स मुंबईचे सुरेंद्र गंगण , मॅक्स महाराष्ट्र मुंबई मनोज भोयर , जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके ,संपादक रुपेश पाडमुख , साहित्यीक शिवा कांबळे आदी सह कंधार येथील पत्रकार मिर्झा जमीर बेग , दिगांबर वाघमारे , एस पी केंद्रे , एन डी जाभाडे , ज्ञानेश्वर पाटील तेलंग आदीची उपस्थिती होती .हिंदुस्थान टाईम्स मुंबईचे सुरेंद्र गंगण , मॅक्स महाराष्ट्र मुंबई मनोज भोयर यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा संतोष देवराये व आभार रुपेश माडमुख यांनी मानले