नांदेड : छत्तीसगड मधील पत्रकार मुकेश चंद्रकार यांची क्रूर हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ फासावर लटकवा आणि देशभरात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा या मागणीसाठी आज जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे, माजी जिल्हाअध्यक्ष गोवर्धन बियाणी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक रवींद्र संगणवार, परिषद प्रतिनिधी सुभाष लोणे यांच्या नेतृत्वात पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
जी पी मीसाळे , बजरंग शुक्ला, पंढरीनाथ बोकारे,नरेश दंडवते, लक्ष्मण भवरे , सखाराम कुलकर्णी , राम तरटे, राजेश शिंदे,माधव गोधणे,सुरेश काशिंदे,प्रशांत गवळे, गजानन कानडे, रविंद्रसिंघ मोदी, अनुराग पोवळे, दीपक कसबे, शरद काटकर, राहुल साळवे, संगमेश्वर बाचे, कैलास जाधव, विजय खंदारे, शेख याहीया, भास्कर जांबकर, गंगाधर गच्चे, संभाजी सोनकांबळे, कोंडदेव हाटकर, राजीव गिरी आदींची उपस्थिती होती.