मुदखेड दि. ७ शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही आमदार अॅड. श्रीजया चव्हाण यांनी दिली आहे.विधानसभा निवडणुकी पूर्वी सिंचन ,दळण -वळण,शिक्षणसह विविध क्षेत्रातील दिलेल्या आश्वासनांची पूर्ती व्हावी यासाठी आ.अॅड. श्रीजया चव्हाण ‘अॅक्शन मोड’वर आहेत मंगळवारी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यातील बारड शेंबोली पांढरवाडी या भागात ग्रामस्थांच्या भेटी घेत समस्या, प्रश्न यावर थेट आ.अॅड. श्रीजया चव्हाण यांनी संवाद साधला.
शाळेच्या संदर्भात प्रामुख्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, शैक्षणिक सुविधा पुरविणे, इमारती सुसज्ज करणे यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली यावेळी बारड चे सरपंच प्रभाकर आठवले, प्रा .कैलास दाड, उपसरपंच बाळासाहेब बारडकर, मंगलाताई धुळेकर, नरसिंगराव लोमटे, दिगंबर टिपरसे, निलेश देशमुख, तालुका महामंत्री मुन्ना चांडक , उत्तमराव लोमटे, संचालक निलेश देशमुख, माजी सभापती लक्ष्मणराव जाधव, प्रकाश देशमुख, गजानन कतरे, सय्यद जी एस, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापिका तळमकर मॅडम, व कन्या शाळा मुख्याध्यापक माहुरकर सर, शरद कवळे, माधव लोमटे, प्रदीप देशमुख, किशोर देशमुख चेअरमन, मल्हार बल्लोड, नवनाथ कदम, व सर्व शिक्षक तसेच भारतीय जनता पार्टी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेंबोली येथील उर्दू शाळेला भेट
शेंबोली येथील उर्दू शाळेला भेट देत शेंबोलीच्या विकासाला निधीची कमतरता भासणार नाही असे आश्वासन आ.अॅड. श्रीजया चव्हाण यांनी दिले आहे यावेळी बारड सर्कल चे नेते बाळासाहेब देशमुख बारडकर, सरपंच बालाजी कटिंग, माजी सरपंच राजेंद्र पाटील, दतराम दुबेवाड, नारायण चिंतडे, पंडितराव भोसले, मुकित खान, शेख अफोरोज, शेख. फय्याज, शेरखान आदींची उपस्थिती होती. पांढरवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेत मतदारांचेही आभार मानले यावेळी सरपंच द्वारकाबाई खांडरे, माजी उपसभापती आनंदा गादीलवाड, राम गोदेवाड यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.अॅड. श्रीजया चव्हाण यांनी सांगितल्या
विद्यार्थ्यांना विज्ञानातील गंमतीजमती
भोकर मतदार संघात भाजपा सदस्यता नोंदणी अभियानासाठी आ.श्रीजया चव्हाण दौरे करीत आहेत. मंगळवारी बारड या गावी त्या पोहचल्या. या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर अचानक जिल्हा परिषद शाळेत गेल्या. आमदार आपल्या शाळेत आल्या म्हणून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांना गराडा घातला. त्यानंतर आ.श्रीजया चव्हाण यांनी लगेच त्यांच्यासोबत जमीनीवर बसत मनमोकळ्या गप्पा मारल्या. शाळेतील विज्ञान प्रदर्शनास भेट दिली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानातील अनेक गंमतीजमती सांगितल्या.यावेळी चिमुकल्यांनीही खळखळून हसत प्रतिसाद दिला. त्यानंतर अभ्यास चांगला करा हा, मी पुन्हा येते, असे म्हणून आ.श्रीजया चव्हाण यांनी त्यांचा निरोप घेतला.