आनंदी हॉर्मोन्स…

 

जर हॉर्मोन्सही आनंदी असु शकतात तर मग आपण का नाही ??
काय गं तुला नाही का वाटत प्रेमात पडावं असं ??.. असं मित्र तिला म्हणाला आणि ती विचार करु लागली.. कॉलेजला असल्यापासून तिची काही स्वप्नं होती जी अजूनही तशीच आहेत आणि यात काहीही गैर नाही कारण माणसाने कायम आशावादी असावं आणि त्या स्वप्नात रमावं त्यामुळे आनंदी हॉर्मोन्स डेव्हलप होतात आणि याही वयात व्यक्ती सुंदर दिसु लागतात.. ती एका झाडापाशी जाऊन बसली खरच मित्र म्हणतो तसा विचार करायला काय हरकत असावी ना.. तसही आपण जे मागू ते निसर्ग देतच असतो मग हेही मिळेल.. पण प्रेम ठरवून थोडच होत असतं ??.. ती सुंदर भावना आहे आणि त्या फीलींग्ज सगळ्याच्या बाबतीत येतही नाहीत..
तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराप्रमाणे तिने एक इमेज नजरेसमोर आणली जो तिच्या कॉलेजमधे होता आणि तिला तो खुप आवडायचा पण त्यावेळी तिच्यात डेरींग नव्हतं आणि त्यानंतर आईने ठरवलेल्या मुलाशी तिने लग्न केलं होतं.. लग्नानंतर ती संसारात रमली आणि त्या चॉकलेट बॉयला विसरली पण पुन्हा नव्याने तो आज नजरेसमोर आला आणि मनात खळबळ सुरु झाली.. ज्या गोष्टी त्याच्याकडे होत्या त्या अर्थातच नवऱ्यात नव्हत्या पण तो वाईटही नाही .. आम्हाला मुल झालं नाही हा त्याचा दोष नाही.. विधीलिखीत असेल. पण त्या चॉकलेट बॉयकडे असलेली बासरीची जादू फक्त श्रीकृष्णाकडेच होते.. तो बासरी वाजवू लागला कि तिचे पाय आपोआप थिरकायचे आणि आताही झाडापाशी त्या बासरीचा आवाज ऐकू येउ लागला आणि तिने पायातील चप्पल बाजूला सरकवली आणि पदर खोचुन पायातील पैजणाकडे पहात तिने त्या झाडाभोवती गिरकी घेतली आणि त्याचवेळी तिचं लक्ष गेलं ते तिथे बसलेल्या कपलकडे .. ते दोघेही अंध होते आणि तो बासरी वाजवत होता.. तिने उत्सुकतेने पाहिलं कारण तशी बासरी तिचा चॉकलेट बॉय वाजवायचा .. ती त्यांच्याजवळ गेली आणि त्याला पाहून मटकन खाली बसली कारण तो तिच्या स्वप्नातला राजकुमारच होता… तिने पैंजणाचा आवाज न करता तिथुन निघून जायचा विचार केला आणि तितक्यात मागून आवाज आला.. न भेटताच निघालीस ??.. भेदरलेल्या नजरेने तिने मागे वळून पाहिलं तर तो तोच होता .. पण हा अंध कसा ??.. आणि हे काय होवून बसलं ??.. त्याची बायकोही अंध .. तिने आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाली , देवा हे काय केलस ??.. मी हे कधीही मागितले नव्हते आणि अशा परिस्थितीत तु याला माझ्यासमोर का आणलस ??.. त्यावर तो म्हणाला , अगं देवाने काहीही केलं नाही ही माझी कर्म आहेत.. एका ॲक्सीडंटमधे असं झालय .. अरे पण तु मला कसं ओळखलस ??.. तो म्हणाला , या बासरीवर फक्त तुच ताल धरु शकतेस .. कॉलेजमधल्या सगळ्या आठवणी माझ्या हृदयात आजही ताल धरतात आणि जेव्हा मी बासरी वाजवतो तेव्हा फक्त तुझीच आठवण येते.. ही माझी बायको नंदा दोघेही एका अपघातात अंध झालो .. तिला काय बोलावं काहीच कळेना.. ती तिथून निघून घरी आली आणि सोफ्यावर बसून रडूं लागली.. जो मित्र तिला प्रेमाबद्दल बोलला होता त्याला फोन करुन तिने सगळी हकीगत सांगितली .. तो म्हणाला , अरे यार मी तुला सहजच बोललो होतो कारण तु मला आवडतेस त्यामुळे तुझ्या भावना मला जाणून घ्यायच्या होत्या.. पण तु तुझ्या मनातल्या चॉकलेट बॉय बाबत असा विचार करशील आणि तो अशा अवस्थेत तुला भेटेल असं वाटलही नव्हतं…पण एक गोष्ट क्ल्रीअर झाली ती म्हणजे तुझ्या स्वप्नातला मी असूच शकत नाही त्यामुळे आपण मित्र म्हणुन कायम सोबत राहु.
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *