Take it easy policy..
Urvashi Urvashi take it easy policy हे गाणं तुम्ही सगळ्यानी ऐकलं असेल.. हे माझ्याही आवडीचं गाणं आणि विषय सुचवलाय माझ्या प्रिय मित्राने..
आपण कुठलीही गोष्ट सहजतेने घेतली तर त्यातून मिळणारा आनंदही तितकाच सर्वोत्तम असतो आणि प्रत्येक गोष्टीत/ व्यक्तीत वाईट पहायचं म्हटलं तर त्रासही तितकाच होतो.. एकदा सारी नेसून मी कुठेतरी निघाले होते सचिन त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत ( लॅपटॉप ) काम करत होता .. निघताना सहज प्रेमाने त्याला म्हटलं , कशी दिसते मी ??.. जेमतेम मी त्याला गुडघ्यापर्यंत दिसेन इतकीच मान त्याने वर केली आणि छान असं म्हणाला .. त्याने पूर्ण माझ्याकडे पाहिलही नाही त्यावर मी लगेच म्हटलं, जाऊदेत माझा मित्र सांगेल मी कशी दिसते आणि बाहेर निघून गेले.. इथे वेगळं कपल असतं तर रुसवा , फुगवा , भांडण झालं असतं पण मीही ते Take it easy घेतलं त्यामुळे नात्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि आनंदही मिळाला. काही पॉलीसीज ह्या मरणोत्तर त्यांच्या कुटुंबासाठी असतात पण ही अशी पॉलीसी आहे कि आपण जीवंत असताना सहजतेने आणि सजकपणे आनंद देणारी आहे..
अनेक घटना अनेक प्रसंग आपल्याला ही पॉलीसी शिकवुन जातात.. अगदी सोशल मिडीयावर होणारं ट्रोलिंग असेल तेही सकारात्मकतेने घेउन त्यात काय क्रिएटिव्हीटी करता येते ते पहावं.. सध्या एका अभिनेत्रीला ट्रोल केलं जातय खरं तर तिने काय करावं ही तिची वैयक्तिक बाब आहे .. तिचीच फिल्म रीलीज झाल्यावर डोक्यावर घेउन नाचवणारेही हेच होते म्हणजेच काय तर आपल्याला हा धडा आहे कि अशा चाहत्यांकडून कुठलीही अपेक्षा न करता निमूटपणे आपलं काम करत Take it easy policy वापरावी.. अजून एका ॲक्टर कपलला त्यांच्या डांसींग व्हीडीओवरुन ट्रोल केलं जातय म्हणुन त्यांनी त्यांची कला थांबवली नाही.. ज्याना पहायचय त्यांनी पहावं.. चाहत्यानीही हीच पॉलीसी वापरावी.. सोशल मिडीयावर दर क्षणाला येणारा कंटेंट हा एक तर हास्यास्पद असेल , दुसरं म्हणजे माहिती देणारा असेल , मनोरंजन करणारा असेल किवा टाईमपास म्हणुन असेल किवा पैसे मिळवायला केलेला असेल.. तुम्हाला काय हवय तेच पाहून त्यातलं उत्तम वेचुन बाजूला होता यायला हवं..
मला ट्रोल करणाऱ्यामधून तर मला लिखाणासाठी सुंदर विषय मिळतात आणि त्याचवेळी त्यांचा मौल्यवान वेळ ते वाया घालवतात तो कसा पहा.. मधे एका स्त्रीने मला मेसेज केला होता.. मॅम तुम्ही समाजासाठी डिझॅस्टर आहात त्यावर सकारात्मकतेने मी आर्टीकल लिहीलं होतं…
मधे सोशल मिडीयावर एका ५/६ वर्षीय मुलगी जी आर्टीस्ट म्हणुन सीरीअल मधे काम करते तिला आणि तिच्या कुटुंबाला लोक ट्रोल करत होते कारण तिचा ॲटीट्यूड.. तिचं बोलणं ऐकून मलाही तो ॲटीट्यूड नक्कीच दिसला आणि त्याला जबाबदार तिचे पालक होते पण म्हणुन मी त्यावर रीॲक्ट झाले नाही कारण एक दिवस त्या ॲटीट्यूडचा फटका त्या मुलीला बसणार आहेच पण आपण का आपले शब्द वाया घालवावे.. Take it easy ही पॉलीसी वापरता येत नसेल तर Let it be करावं आणि उत्तम माहिती देणाऱ्या गोष्टी पहाव्यात किवा उर्वशी ला आठवावं..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist