कंधार :- प्रतिनिधी
येथील सामाजिक कार्यक्रत्या सौ.आंम्रपाली राजकुमार केकाटे यांची आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नियुक्ती पत्र देऊन राष्ट्रवादी काॅग्रेस महिला कंधार शहराध्यक्ष पदी निवड केली.
राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.अजित दादा पवार,प्रदेशाध्यक्ष मा.खा.सुनिल तटकरे,राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर,मा.आ.विक्रम काळे यांच्या आदेशानुसार लोहा-कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड येथील बैठकीत सौ.आंम्रपाली केकाटे यांची राष्ट्रवादी काॅग्रेस महिला कंधार शहराध्यक्ष पदी निवड केली.
सौ.आंम्रपाली केकाटे ह्या घर संसार सांभाळत सतत सामाजिक तसेच राजकिय कामात सहभागी राहुन आग्रेसर होतात त्यांनी महिला संघटन करत कोरोणा काळात मोलाची भूमिका बजावली