मुखेड तालुक्यात दर्पण दिन विविधठीकाणी उत्साहात साजरा….! मुखेड पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य व रूग्णांना फळे वाटप.

 

मुखेड:( दादाराव आगलावे)

आचार्य बाळशास्त्री जाभेंकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू करून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचला. सदर दिनाचे स्मरण म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र ६ जानेवारी हा दिवस दर्पण दिन म्हणून साजरा केल्या जातो दर्पण दिनाच्या अनुषगांने मुखेड येथे अ.भा.मराठी पत्रकार परिषद सलग्णीत मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ०३ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये ३ रोजी पत्रकारांच्या रक्ताच्या तपासणी करण्यात असुन ४ रोजी पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच ६ जानेवारी रोजी दिव्यांग, मुकबधिर,मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य व फळे देण्यात आले तसेच उपजिल्हा रूग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले असुन दर्पणदिन मुखेड शहर व तालुक्यात विविध शासकीय कार्यालय, महाविद्यालये व विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आले.

दर्पण दिनानिमीत्त तहसिल कार्यालय येथे तहसीलदार राजेश जाधव यांनी सर्व पत्रकारांचा शाॅल, पुष्पगुच्छ, लेखणी देवून सत्कार केले. तसेच काँग्रेसचे प्रदेश सचिव डाॅ.श्रावण रॅपनवाड यांनी सर्व संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार बांधवाचे सन्मान करुन शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर पिएश्री,आदर्श शाळा,जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड प्रशालेच्या वतीने पत्रकारांचा यथोचित सत्कार करुन मुख्याध्यापक डी. जे. कांबळे, अध्यक्ष महेताब शेख व सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या. तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य राऊत यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा देवून सत्कार केला यावेळी प्राध्यापक व पत्रकार उपस्थित होते. त्याचबरोबर कैलास मुडंकर सरांचे ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल व स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या वतीने संचालक संजिव डोईबळे यांनी पत्रकारांचा शाल, फेटा, लेखणी, मिठाई भेट देवून सत्कार करण्यात आले. त्याचबरोबर कालिकामाता मतिमंद विध्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वतीने पत्रकार बांधवाचे सत्कार करण्यात आला. यासोबतच विविध शासकीय कार्यालय, महाविद्यालय,विद्यालयात पत्रकारांचे सत्कार करुन दर्पणदिन साजरा करण्यात आले. त्याचबरोबर दर्पण दिनानिमित्त अ.भा.मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यामध्ये दि.३ जानेवारी रोजी गजानन बंडे यांचे धन्वतंरी क्लिनिकल लॅबच्या वतीने पत्रकारांची शुगर, मधुमेह, सिबीसी, काॅलेस्ट्राॅल, लिव्हर, जोडणी, थाईराॅईड, हाडाचे कॅल्शिअम सह इतर रक्ताच्या चाचण्या मोफत करण्यात आले. तसेच ०४ जानेवारी रोजी उपजिल्हा रूग्णालयात पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली यात बिपी, शुगर, ईसीजी, एक्सरे, दतंरोग, नेत्र तपासणीसह विविध तपासण्या तज्ञ डाॅक्टरांच्या मार्फत करण्यात आल्या तर ६ जानेवारी रोजी शहरातील कालिका माता मंतिमद विद्यालय व यशवंत अपंग विद्यालय या दोन्ही शाळेतील अपंग, मुकबधीर व मतिमंद विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणीक साहित्य व फळे देण्यात आले असुन उपजिल्हा रुग्णालयात सर्व रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

यावेळी अ.भा.मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेताब शेख, सचिव राजेश बंडे,जेष्ठ पत्रकार यशवंत बोडके, अॅड संदीप कामशेट्टे, दादाराव आगलावे, अॅड आशिष कुलकर्णी, दत्तात्रय कांबळे, रामदास पाटील, संजय कांबळे, नामदेव श्रिमंगले, जैनोदीन पटेल, विठ्ठल पाटील, राजु रोडगे, जगदिश जोगदंड, गणेश आंबेकर, शेख मोतीपाशा पाळेकर, संपादक असद बल्खी, संपादक भारत सोनकांबळे, रवी सोनकांबळे यांच्यासह अनेक पत्रकार बांधव तसेच दोन्ही शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *