कंधार ; प्रतिनिधी
दर्पण दिनाचा औचित्य साधून दि ७ जानेवारी रोजी कंधार तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार सन्मान करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार डॉ दिनकर जायभाये ,तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार हफीज घडीवाला ॲड दिगंबर गायकवाड ,रमेशसिंह ठाकुर आदीसह वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कंधार डॉ.किशोर कदम यांची व्यासपिठावर उपस्थिती होती .
कार्यक्रमाच्या सुरूवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
अधिक्षक कार्यालयीन रामचंद्र पल्लेवाड डॉ , महेश पोकले , डॉ गजानन पवार, डॉ प्रियंका मंतावार , डॉ निखत फातेमा , अश्विनी जाभाडे शिल्पा केळकर , प्रियका जाधव , सोनकांबळे पल्लवी , अरविंद वाठोरे , शंकर चिवडे , अशिष भोळे , दिलीप कांबळे आदीसह रुणालयील कर्मचारी उपस्थित होते .यावेळी शहरातील पत्रकार
प्रल्हाद आगबोटे , राजू कांबळे , माधव भालेराव , एस पी केंदे , महंमद सिंकदर , सय्यद हबीब , नितीन मोरे , महंमद अनसारोदीन , दिगांबर वाघमारे , मारोती चिलपिंपरे , प्रा सुभाष वाघमारे , मयुर कांबळे , भुंजगराव सोनकांबळे , निलेश गायकवाड , मुरलीधर थोटे , विश्वांबर बसवंते , दयानंद कदम , सिद्धार्थ वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला ,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ . बालाजी गुडमेवार यांनी केले .