कंधार | धोंडीबा मुंडे
कंधार तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड कंधार येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मि.पौ.शु ८ शके १९४६ दि.०७ जानेवारी २०२५ पासून राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भागवतकथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.दि.०७ जानेवारी मंगळवार पासून प्रारंभ होत असून दि.१४ जानेवारी रोजी मंगळवारी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने या ज्ञानयज्ञाची सांगता होणार आहे.
कंधार-लोहा तालूक्यातील पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भगवानबाबा सप्ताह समिती भगवानगड कंधार व भगवानबाबा सेवाभावी प्रतिष्ठाण कंधारच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे.पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन,दुपारी १ ते ४ भागवत कथा,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ तसेच रात्री ७ ते ९ हरिकिर्तन होणार आहे. ज्ञानयज्ञातील भागवत कथा ह.भ.प.माधव महाराज देवकत्ते घागरदरेकर यांची होणार आहे,या सप्ताहात कंधार- लोहा तालुक्यातील व पंचक्रोशितील सर्व भजनी मंडळ उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमांचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती भगवानगड कंधार व भगवानबाबा सेवाभावी प्रतिष्ठाण कंधार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
——————————-*अखंड हरिनाम सप्ताहातील किर्तनकार वेळ रात्री ७ ते ९ राहिल,*
दि.०७ जानेवारी २०२५ श्री.ह.भ.प.देविदास महाराज गिते चोंडीकर माळाकोळीकर, दि.०८ जानेवारी ह.भ.प माधव महाराज देवकत्ते घागरदरेकर,दि.०९ जानेवारी श्री.ह.म.प. पंढरीनाथ महाराज मुरकुटे नांदेड,दि.१० जानेवारी श्री.ह.भ.प.मोहन महाराज खुर्दळीकर,दि.११ जानेवारी श्री.ह.भ.प.माधव महाराज मुंडे पाताळगंगा,दि.१२ जानेवारी श्री.ह.भ.प. ज्ञानोबा माऊली महाराज शिंदगीकर,दि.१३ जानेवारी श्री.ह.भ.प.पंडू महाराज हाडोळीकर, दि.१४ जानेवारी श्री.ह.भ.प. वासुदेवशास्त्री मुंडे गोपीनाथगड परळीकर व काल्याचे किर्तनकार श्री.ह.भ.प.वासुदेवशास्त्री मुंडे गोपीनाथगड परळी यांचे होणार आहे.