(कंधार ; दिगांबर वाघमारे )
जिवनात यशाचे उतूंग शिखर गाठायचे असेल तर बालवयात शालेय जिवनापासूनच स्पर्धा परीक्षांचे धडे आणि मार्गदर्शन मिळाले तर भविष्यात यशाचे शिखर पादाक्रांत करता येईल असे मार्गदर्शन सौ.मनीषाताई पुरुषोत्तम धोंडगे यांनी कंधार येथे गरुड झेप कोचिंग क्लासेस कंधार द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोदय सराव स्पर्धाचे बक्षिस वितरण प्रसंगी केले .
कंधार शहरातील शिक्षणतज्ज्ञ सौ रंजना लुंगारे यांच्या गरुड झेप कोचिंग क्लासेस च्या वतीने दि.५ जानेवारी२०२५ रोजी छत्रपती शंभुराजे इंग्लीश मेडीयम स्कुल कंधार या परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोदय सराव पेपर मध्ये कंधार तालुक्यातील सुमारे साडेतिनशे विद्यार्थांनी सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले त्यांना सौ मनीषाताई पुरुषोत्तम धोंडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या .
या स्पर्धेत पहिले बक्षीस दोन हजार एक रुपये,दुसरे बक्षीस १ हजार ५०१ रुपये व तिसरे बक्षीस एकहजार एक रुपये असे होते त्यात प्रथम पारितोषिक समरवीर योगेंद्रसिंग ठाकूर कंधार व स्वरा सरचंद्र डांगे लोहा ,दुसरे बक्षीस अभिषेक धनाजी वाघमारे कंधार ,कपील आनंद कदम कंधार तर तिसरे बक्षिस अद्वैत गोपीनाथ केंद्रे कंधार,आर्यन धोंडीबा मुसळे कंधार, कौस्तूभ सुर्यकांत देवकत्ते असे बक्षिस आणि एकूण 21 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले .
सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माणिक बोरकर,राजू केंद्रे,अशोक झडते, विजय दिग्रसकर,प्रल्हाद बोरकर ,ओमप्रकाश येरमे,हानमंत जोगपेठे ,रमेश गडपवार,सुनिता वंजे ,पेटकर मॅडम,सोनी वंजे,पवार मॅडम, योगीराज स्वामी,गायकवाड मॅडम,कदम , भागवत सरनाईक ,यांच्यासह छत्रपती शंभुराजे इंग्लीश मेडीयम स्कुल कंधार येथिल सर्व कर्मचारी व मित्रमंडळी यांनी मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली .