फुलवळ प्रतिनिधी (धोंडीबा बोरगावे)
मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा ६ जानेवारी हा जन्मदिवस सर्वत्र पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच प्रमाणे कंधार तालुक्यातील फुलवळ मराठी पत्रकार संघानेही तो आज मोठ्या उत्साहात साजरा करून पत्रकारितेच्या जनकाला नम्रपूर्वक अभिवादन केले.
या आयोजित सोहळ्यात प्रथमतः दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणं झाली . तसेच फुलवळ पत्रकार संघाकडून एकजुटीचा सामुदायिक संकल्प करत निर्भीड पत्रकारिता करतांना लेखणीच्या माध्यमातून वंचितांना न्याय मिळवून देत गाव व समाज विकासासाठी सकारात्मक बातम्या छापून लेखणीची धार कायम तेज ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प ही करण्यात आला .
यावेळी फुलवळ येथील पत्रकार धोंडीबा बोरगावे , विश्वाम्भर बसवंते , परमेश्वर डांगे , होनाजी शेळगावे , चेअरमन दत्ता डांगे आदीसह अरुण वडजे , आनंदा पवार , परासराम पटणे , विठ्ठलराव तुप्पेकर , रंगनाथ पांचाळ , शिवानंद मंगनाळे , बालाजी देवकांबळे राजीव राठोड , रामू बोरगावे व ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती.