*कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे*
स्त्रीयांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शैक्षणिक विश्वाचे द्वार उघडून त्यांचे अंधकारमय आयुष्य शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती स्टार पब्लिक स्कूल दिग्रस येथे साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा संजय पवार हे होते शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार या प्रमाणे भविष्यात तुम्ही पण एक आदर्श शिक्षिका व्हावे असे आवाहन संजय पवार यांनी केले.कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून किरण वडजे लाभले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सन २०२३ – २०२४ या शै वर्षामध्ये जि प हा मुलीचे तालुका मुखेड येथील एक विद्यार्थिनी कु अनुष्का शेषेराव चव्हाण ९५% गुण प्राप्त केल्याबदल प्रा पवार यांच्या हस्ते अनुष्का चव्हाणचाही सन्मान करण्यात आला . तसेच उपस्थित माता पालक सौ मंगलबाई शिंदे , सौ सखुबाई वडजे , सौ शारदाबाई पांचाळ याही माता भगिनींचा स्टार पब्लिक स्कूल च्या वत्तीने या शाळेच्या आदर्श शिक्षिका सौ अस्मिता राठोड मॅडम याच्या हस्ते माता भगिनीचा सन्मान करण्यात आला .
या कार्यक्रमात रिया जाधव, आर्पिता कांबळे ,रितिका वडजे, साक्षी चव्हाण, श्रध्दा वडजे ,दुर्गेश्वरी नावंदे ,नम्रता कुलकर्णी, सान्वी पाटील ,सान्वी पांचाळ काजल चव्हाण ,पल्लवी वडजे ,स्वाती पवार, राजेश्री जाधव ,अक्षरा जाधव ,वैभवी मगर ,दिपिका जाधव ,पुनम वडजे ,दिव्या जाधव इ विद्यार्थिनींनी सावित्री बाई फुले यांच्या वेशभुषा परिधान करून उपस्थिती दर्शवली.
सावित्रीच्या लेकी या भाषण स्पर्धा घेण्यात आली यात अर्पिता कांबळे ,रितिका वडजे, वैभवी मगर, स्वाती पवार ,दिपिका जाधव व विराज सूर्यकांत वडजे या विद्यार्थिनींनी प्रथम दितीय तृतीय क्रमाक मिळविल्या बदल त्याचाही सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ राठोड मॅडम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ पवार वैशाली मॅडम यानी परिश्रम घेतले.