कंधार ; प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रात पोलिस रेझिंग डे निमित्य शालेय विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यातील कार्यप्रणाली,शस्त्रास्त्र अन् पोलिस मित्रांचा समाजात शांतता राखण्यासाठीचे अतुलनीय कार्याची ओळख शालेय शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यास होणे ही काळाची लक्षात घेता अख्या महाराष्ट्राभर हा उपक्रम कार्यान्वित आहे.म्हणून कंधार पोलीस स्टेशन येथे पोलीस रेझिंग डे पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या पोलीस स्टेशन भेट कार्यक्रम घेऊन त्यांना पोलीस स्टेशन कामकाजाबाबत माहिती दिली. पोलिस निरीक्षक जाधव साहेब यांचे कविमन असल्याने आपल्या प्रतिभेतून विद्यार्थ्यांना अगदी शिक्षकासम समजून सांगतांना विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शना त्यांनी डायल 112 तसेच बालकांचे लैंगिक छळ संबंधी कृत्यांबाबत व कायदेशीर उपाययोजना बाबत त्यांना समजेल अशा पद्धतीने माहिती दिली. नायलॉन मांजाचा होणारा दुष्परिणाम याबाबत माहिती देतांना विद्यार्थ्यांना पतंगबाजीत कशी दक्षता घ्यावयाची याची इत्थंभूत माहिती देऊन तो मांजा जीवावर बेतु शकतो.हा धोकादायक मांजा न वापरण्याबाबत सतर्क केले.*
शस्त्रांसंबंधी माहिती, तसेच ठाणे अंमलदार ,वायरलेस, इत्यादी बाबतची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली. तसेच लॉक अप (कारागृह) पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली .श्री शिवाजी हायस्कूल कंधार चे मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड ,पर्यवेक्षक ऐनोद्दीन शेख , श्री दत्तात्रय येमेकर अझर बेग ,आचार्य आर्य ,उपलंचवार सर,संजय कदम , सौ.अंजली कानिंदे मॅडम,सौ. देशपांडे मॅडम,आदी अन्य शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.
शेेवटी कंधार पोलिस ठाण्याच्या पुढे एक आठवणीचे सुंदर छायाचित्र घेऊन जणुकांही आभ्यासाची एका सहलीची विद्यार्थ्याना अनुभूती आली.अशी भावना मुुलांनी व्यक्त केली.कंधार ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सपोनी खजे, पो उपनिरीक्षक इंगोले ,स पो उपनिरीक्षक कागणे, पो हवादार साखरे, गारोळे सर ताटे ,पो ना टाकरस,पो शि हराळे, सोनटक्के, गुंड्रे, मपोशी कांबळे, मारवाडे यांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.