मुखेड : प्रतिनिधी
एकात्मिक बाल विकास मेळावा बिट बेरळी (बू) प्रकल्प अंतर्गत पांडूर्णी येथे पालक मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. राठोड ताई होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसंचालक लातूर दत्तात्रय मठपती व सौ सूनिताबाई दत्तात्रय मठपती यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच विमलताई भागवत किनवाड, सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी दिगंबर मठपती, माजी सरपंच सौ.शिलाताई व्यंकटराव लोहबंदे, पोलिस पाटील ज्ञानेश्वर जाहिरे, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीराम पाटील पांडुर्णीकर, मेळावा आयोजक सौ.सूरेखा सूर्यवंशी, मुक्ताबाई श्रीरामे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यास मार्गदर्शन करताना आरोग्य अधिकारी दिगंबर मठपती म्हणाले की, अंगणवाडीच्या माध्यमातून लहान मुलांना नीती मुलांचे धडे देत त्यांना घडविण्यासाठी मोलाचं कार्य करता आहात आपली सेवा ही अनमोल आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि. प. प्राथमिक शाळा आडमाळवाडीचे मुख्याध्यापक नामदेव पाटील सूर्यवंशी यांनी केले तर आभार सूनिताबाई यांनी मानले. यावेळी तालुक्यातील सुपरवायझर, अंगणवाडी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या रेखीव आयोजनाबद्दल सर्व स्तरातून आयोजकाचे अभिनंदन होत आहे.
उपसंचालकाची श्री संत नामदेव महाराज वाचनालयास भेट
उपसंचालक दत्तात्रय मठपती यांनी श्री संत नामदेव महाराज वाचनालय येथे सदिच्छा भेट दिली. वाचनालयातील सुविधा पाहून त्यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. वाचनालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम पाटील पांडुर्णीकर, वाचनालयाचे सचिव मनोहर सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, किशोर सूर्यवंशी, हनुमंत सूर्यवंशी, पांडुरंग कर यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.