आनंदनगरीतून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे मिळतात – चेतनभाऊ केंद्रे….. कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत आनंदनगरी कार्यक्रमाला प्रतिसाद

 

(कंधार ; दिगांबर वाघमारे )

बालकांना बाल मनावर संस्कार घडविण्याचे कार्य शाळेतून होते .शालेय शिक्षणासह समाजात कसे वागावे , यश अपयश कसे पचवावे आणि अडचणीचा सामना कसा करावे यासह जिवनात आर्थिक गणित बिघडल्याने काय होते ?हे समजावे म्हणून शालेय जीवनात आनंदनगरीसह विविध उपक्रम राबविण्यात यावे कारण आनंदनगरी उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे मिळतात असे प्रतिपादन संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव चेतनभाऊ दौलतराव केंद्रे यांनी कंधार येथे केले .

प्रजासत्ताक दिनानिमित्त आज दि २० जानेवारी २०२५ रोजी कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत आनंदनगरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या आनंदनगरी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव मा.चेतनभाऊ दौलतराव केंद्रे बोलत होते .

यावेळी महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी जी यांच्या हस्ते सचिव मा.चेतनभाऊ दौलतराव केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना चेतनभाऊ केंद्रे म्हणले की आनंदनगरी खरी कमाई उपक्रमातून बालकांना आर्थिक व्यवहार यासह गणिती व्यवहार समजण्यासाठी उपयुक्त ठरेल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राबविलेल्या सर्व उपक्रमांना विद्यार्थांनी प्रतिसाद द्यावा ,यश अपयश याचा विचार न करता सहभाग नोंदवावा
असे आवाहन त्यांनी यावेळी केले . कार्यक्रमाचे सहशिक्षक राजू केंद्रे यांनी सुत्रसंचलन केले तर आनंदा आगलावे यांनी आभार मानले . सौ उषा कागणे , चंद्रकला तेलंग यांनी परिश्रम घेतले .


आनंदनगरी उपक्रमासाठी शिक्षक नेते तथा विद्याविकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजहंश शहापुरे ,श्री शिवाजी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक महासंघाचे विभागीय सचिव हरीहर चिवडे , शिक्षक संघाचे कंधार तालुकाध्यक्ष तथा प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भास्कर पाटील कळकेकर , पालक तथा सामाजिक कार्यकर्त शिवराज कौसल्ये पाटील , के पी नवघरे , मनोविकास प्राथमिक शाळेचे शिक्षक विरभ्रद्र बेलूरे , श्री शिवाजी प्राथमिक शाळेचे शिक्षक विलास मोरे पाटील आदीसह पालकांची व विद्यार्थांची उपस्थिती होती .

#महात्मा_फुले_प्राथमिक_शाळा_कंधार
#Mahatma_phule_primary_school_Kandhar
#Mahatma_phule #Digambar_Waghmare #दिगांबर_वाघमारे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *