नांदेड ( प्रसिद्धी प्रमुख बी . एस . सरोदे )
जिल्हयातील सेवानिवृत्त शिक्षक , केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक, शिक्षणविस्तारअधिकारी यांच्या सेवानिवृत्तीची उपदान व अंशराशीकरणाच्या रकमा व सातव्या वेतन आयोगाच्याय थकित हप्त्याच्या रकमा तसेच अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या रकमा यासाठी तात्काळ आर्थिक निधीची तरतूद करून सेवानिवृत्तांना लाभ मिळवून देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , अधिकारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत निवेदन पाठवले आहे .
जिल्हयातील अनेक शिक्षक केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक व शिक्षणविस्तार अधिकारी हे कर्मचारी सन २०२४ मध्ये सेवानिवृत्त झालेले असतांना त्यांना त्यांच्या हक्काचे पेन्शन विक्री , ग्रच्चुएटी व सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रक्कम तात्काळ मिळायला हव्या होत्या पण अद्याप मिळाल्या नसल्याने याबाबत शासनाकडे वारंवार निवेदने देऊनही या मागण्या सुटल्या नसल्याने यासाठी तात्काळ शासनस्तरावर आर्थिक तरतूद करून सेवानिवृत्तांना न्याय मिळऊन द्यावा अन्यथा जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सोमवार दि . २० जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनात दिला असून निवेदनावर राज्य उपाध्यक्ष सुधिर गोडघासे , राज्य संघटक बालाजी डफडे , राज्य समन्वयक विठ्ठल ताकबिडे ,जिल्हाध्यक्षा विजया घिसेवाड , जिल्हा सरचिटणीस रमेश गोवंदे , जिल्हा कार्याध्यक्ष एम . बी . शेख , जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी इंगळे , प्रभाकर कमटलवार नांदेड, खजिनदार विठ्ठल मूत्तेपवार, तालुका उपाध्यक्ष संजय कुमार सावळे, सल्लागार जगदीश खडकीकर, कोषाध्यक्ष पडगिलवार सर पांडे मॅडम ,बिलोली तालुका अध्यक्ष लक्ष्मण रामपुरे नायगाव तालुका सचिव संतुकराव आनेलवाड, सल्लागार रावण चिकलवाड मुखेड तालुका कोषाध्यक्ष सय्यद अली, बागेकर मॅडम इत्यादी सह असंख्य सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .