श्री शिवाजी हायस्कूल अध्यापनालयाची सहल छ.संभाजीनगर दर्शन करुन सुखरुप कंधारला.

 

 

 

मराठवाड्याची ऐतिहासिक राजधानी असलेल्या छ.संभाजी नगराची दर्शन यात्रा श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेतील मातृअध्यापनालय श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधारची शैक्षणिक सहल दि.१५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास श्री शिवाजी हायस्कूल येथुन निघुन क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार नगरीत ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार, संस्थापक व संचालक डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांची “क्रांतिज्योत ज्ञानसागर शक्तीपीठ”या चीरसमाधी प्रेरणा स्थळाचे दर्शन घेतांना संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे यांनी सर्व सहलीत सहभागी शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर बंधु-भगींनीच्या मनगटावर डाॅ.भाई मुक्ताईसुताच्या शैलीप्रमाणे अत्तरगंध लावून मानाची जयक्रांति करत सदिच्छा दिल्या.या प्रसंगी शालेय समितीच्या अध्यक्षा सेवानिवृत्त प्राध्यापिका लिलाताई आंबटवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उर्दू मराठी कंधारची सहल दिनांक १५ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगरातील ऐतिहासिक ५२ दरवाजांचे दर्शन घेऊन

सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे छत्रपती संभाजीनगर मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान १९८५ मध्ये छोट्या स्वरूपात सुरू करण्यात आले होते. हे उद्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे २०० पेक्षा जास्त प्राणी व पक्षी आहेत. हे एक राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणीय स्थळ असून यात हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या शौर्यगाथेची आठवण व्हावी म्हणून शौर्यस्मारक निर्माण केले त्यांचे दर्शन विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे “सिद्धार्थ” नाव हे गौतम बुद्धांच्या नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात तथागत भगवान बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला.

 

वेरूळ लेणी
“आधी कळस मग पाया” या वेरुळ लेणीचा आत्मा आहे.
वेरूळ लेणी भारतीय स्थापत्यशास्त्रातील एक अद्भुत नमुना आहे. या लेणी महाराष्ट्र सातमाळा डोंगररांगेच्या कडेकपारित कोरलेल्या साधारणत पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी असून, यामध्ये १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन लेणी आहेत.५ व्या ते १० शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेणीतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण (प्रथम) यांच्या काळात झालेली आहे. या लेण्यापैकी १० क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे. इसवी सनाच्या ७५३ ते ७५७ या काळातील हा लेख आहे. कैलास लेणे निर्माण करणारा राजा कृष्ण (पहिला) हा दंतीदुर्ग राजाचा काका होता. कैलास लेण्याची निर्मिती ही इसवी सनाच्या ७५७ ते ७८३ या काळातील असावी असे यावरून समजते.म्हणुन कंधार तालुक्यातील प्रत्त्येकांनी कैलास लेणे शिव मंदिराचे दर्शन घेणे सौभाग्य समजले जाते.घृष्णेश्वर मंदिराची निर्मिती अहिल्याबाई होळकर यांनी केली आहे.हे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगातील शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणून गणना होते.दौलताबादचा किल्ला ६ व्या शतकाच्या आसपास, देवगिरी हे पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या कारवां मार्गांसह सध्याच्या छ. संभाजीनगर जवळील एक महत्त्वाचे उंचावरील शहर म्हणून उदयास आले.शहरातील ऐतिहासिक त्रिकोणी किल्ला सुरुवातीला ११८७ च्या आसपास पहिला यादव राजा, भिल्लमा पाचवा याने बांधला होता.१३०८ मध्ये, हे शहर दिल्ली सल्तनतच्या सुलतान अलाउद्दीन खल्जीने जिंकले होते, ज्यांनी भारतीय उपखंडाच्या बहुतेक भागावर राज्य केले होते. १३३२ मध्ये, दिल्ली सल्तनतच्या सुलतान मुहम्मद बिन तुघलकने शहराचे नाव देवगिरीवरून दौलताबाद केले आणि आपली शाही राजधानी दिल्लीहून शहरात हलवली, दिल्लीच्या लोकसंख्येचे दौलताबाद येथे स्थलांतर करण्याचा आदेश दिला. तथापि, मुहम्मद बिन तुघलकने १३३४ मध्ये आपला निर्णय उलटवला आणि दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीला परत हलवण्यात आली. बीबी का मकबरा १६६८ मध्ये राबिया दुरानी किंवा बीबी का मकबरा ही मकबरा औरंगजेबाचा मुलगा आझम शाह याने त्याची आई दिलरास बेगम यांच्या स्मरणार्थ बांधली होती, ज्यांना तिच्या मृत्यूनंतर राबिया दुरानी हे नाव देण्यात आले होते. ताजमहालची प्रति प्रतिमा असल्याने या समाधीला दख्खनचा ताज किंवा दख्खनी ताज असेही म्हणतात.जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील पैठण तालुक्यातील जायकवाडी गावाच्या ठिकाणी गोदावरी नदीवर असलेले मातीचे धरण आहे. हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे.यालाच आपण नाथसागर म्हणतो.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीत मराठवाड्यातील शेतजमिनीला सिंचनासाठी हे पाणी प्रामुख्याने वापरले जाते.पैठण नगरीतील भारुडकार संतश्रेष्ठ एकनाथ महाराज समाधी दर्शन
संत एकनाथ महाराजांचे समाधिस्थान. या मंदिराची पुनर्बाधणी नाथांचे ११ वे वंशज संस्थानाधिपती श्री भानुदास महाराज गोसावी यांनी केली आहे. या मंदिरास प्रशस्त परिसर लाभला आहे. नाथांचे वंशज सध्या पैठणमध्ये राहतात. पैठण हे तालुक्याचे ठिकाण असून नाथांचे पैठण म्हणूनच ओळखले जाते.येथे असलेला तीर्थखांब शककर्ता शालिवाहनचा आहे.या स्तंभाचे दर्शन प्रत्येक मराठी माणसाने घेतले पाहिजे.कारण गंगधडीच्या प्रत्येक माणसाने दर्शन घेणे भाग्य मानले जाते.चैत्र प्रतिपदेला गुढी पाडवा साजरा करत मराठी नववर्षाचे स्वागत मराठवाडा नव्हे महाराष्ट्र करतो.त्या शेजारी सुंदर ज्ञानेश्वर उद्यान पाहून संगीत कारंज्यांचा मनमुराद आनंद घेऊन या ऐतिहासिक स्थळांना भेटी देवून १८ जानेवारी २०२५ रोजी कंधारला सुखरूप पोहचलो. या सहलीसाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रा पुरुषोत्तम धोंडगे साहेब , सचिव गुरूनाथराव कुरुडे साहेब, सहसचिव ॲड मुक्तेश्वर धोंडगे साहेब , शालेय समिति अध्यक्षा प्रा लिलाताई आंबटवाड मॅडम यांनी परवानगी देऊन मोलाचे मार्गदर्शन केले त्यामुळेच ही सहल यशस्वी होऊ शकली . बस आगार प्रमुख अभय वाढवे साहेबांनी व तेथील अधिकारी श्री जोगे साहेबांनी कमी वेळेमध्ये तीन बस उपलब्ध करून दिल्या .सहलीसोबत असणारे प्रमुख मार्गदर्शक शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर,उपमुख्याध्यापक प्रा.मुरलीधर घोरबांड सर यांनी (सहलीच्या प्रमुख पदाची धुरा उत्कृष्ट पध्दतीने वाहिली.)

पंडीत लाडेकर सर कार्यालयातील ओएस ,चौकले सर , पत्रकार जमीर बेग सर ,कानिंदे मॅडम, नाईक मॅडम , डांगे मॅडम , आयनोद्दिन सर , उपलंचवार सर ,झुंझुरवाड सर , प्रकाश पवार सर, अन्नकाडे सर ,संजय कदम सर ,सचिन जाधव सर, केदार पटणे सर, मन्मथ पेठकर, सारिका जायेभाये या सर्वांनी जबाबदारी घेवून सहल यशस्वी केली . छत्रपती संभाजीनगर रांजणगाव येथील मुख्याध्यापक मा. अनिलजी घारुळे सर आणि डाॅ.भाई केशवरावजी
धोंडगे साहेब यांनी ७ ऑगस्ट १९४८ रोजी केलेल्या झेंडा सत्याग्रहात निजाम पोलिसाच्या लाठ्या-काठ्या झेलल्या पण हातात असलेला प्राणप्रिय तिरंगा राष्ट्रध्वज खाली पडू दिला नाही.या देशाभिमान भावनेची आठवण म्हणून भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब व अँड शरदरावजी गव्हाणे साहेब आणि सहकार्याच्या मदतीने १९६१ या वर्षी खोकडपूरा (तत्कालीन औरंगाबाद)आत्ताचे छ.संभाजीनगर येथे श्री शिवाजी हायस्कूल या ज्ञानालयाची सुरुवात केली.त्या अध्यनालयाचे मुख्याध्यापक मा.गौतमजी आढाव सर व त्यांच्या सर्व सहकार्यांनी सहलीत सहभागी सहशिक्षकांचा यथोचित सन्मान करुन सहलीच्या राहण्याची व भोजनाची अतिशय उत्तम व्यवस्था केली.

त्या बद्दल आमच्या श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या अध्यापकालयाच्या वतीने आभाराभिनंदन करुन मानाची जयक्रांति.या सहलीत 127स्काऊट व गाईड अन् 15 शिक्षक व शिक्षकेतर बंधु-भगीनी सहभागी होते.आदरणीय पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना सहलीत पाठवून सहकार्य केले.त्या बद्दल पालकांचे मनस्वी आभार.आदर्श बस चालक लाडेकर मनोहर बस क्रमांक एम.एच.२० बी.टी.१९९८.आदर्श बस चालक ऊल्हास राठोड,एम.एच.२० बी.एल ४००३ आणि गणेश सोनकांबळे एम.एच १४ बी.टी.२०१४ या त्रिदेव चालकांनी उत्कृष्ट वाहन चालवल्याने सहलीचा प्रवास उत्तम प्रकारे झाला.या बद्दल तीनही चालकांचे शाळेच्या वतीने आभाराभिनंदन व मानाची जयक्रांति!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *