1 फेब्रुवारीच्या सेलू येथील मेळाव्यास उपस्थित रहा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन

 

 

नांदेड,दि.24 – मराठी पत्रकार परिषद मुंबई, परभणी जिल्हा मराठी पत्रकारसंघ व सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित आदर्श जिल्हा व तालुका पुरस्कार वितरण तसेच पत्रकार मेळावा दि. 1 फेब्रुवारी रोजी परभणी जिल्हयातील सेलू येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यास नांदेड जिल्हयातील पत्रकारांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सेलू येथील साई मंगलकार्यालयात दि.1 फेब्रुवारी रोजी सदरील कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख हे राहणार असून या कार्यकमासाठी परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, विश्‍वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, उपाध्यक्ष गोपी लांडगे, गणेश मोकाशी,हेमंत वनजू, अविनाश भांडेकर,चंद्रकांत बरदे, विभागीय सचिव दिपक कैतके, पी.पी.कुलकर्णी, रवी उबाळे, प्रदिप घुमटवार,शिखरचंद बागरेचा, मनोज खांबे, सचिन शिवशेट्टे, अमोल खरे, चंद्रकांत क्षीरसागर, राज्य प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, सहायक राज्य प्रसिध्दी प्रमुख भरत निगडे, राज्य महिला आघाडी प्रमुख शिवभा जयपूरकर, डीजीटल मिडिया परिषदेचे राज्यप्रमुख अनिल वाघमारे, , डीजीटल मिडिया परिषद कार्याध्यक्ष सनी शिंदे, डीजीटल मिडिया प्रमुख परिषद उपाध्यक्ष अनिल उंबरकर आदींची प्रमूख उपस्थिती राहणार आहे.
तरी या मेळाव्यास जिल्हयातील पत्रकार बांधवांनी सेलू येथे सकाळी 9.30 वाजता उपस्थित राहून परिषदेने आयोजित केलेल्या एकता रॅलीस सहभागी व्हावे असे आवाहन राज्य उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, पत्रकार अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष विजय जोशी,परिषदेचे माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, माजी जिल्हाध्यक्ष ॲड.प्रदीप नागापूरकर, महानगरचे माजी कार्याध्यक्ष अनिल कसबे, माजी जिल्हाउपाध्यक्ष लक्ष्मण भवरे, परिषदेचे जिल्हा प्रसिध्दी प्रमूख ॲड.दिगांबर गायकवाड, पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक रवी संगनवार, माजी प्रदेश प्रतिनिधी सुभाष लोणे, माजी जिल्हा सरचिटणीस राम तरटे,माजी सरचिटणीस नरेश दंडवते, माजी सचिव बजरंग शुक्ला, माजी कोषाध्यक्ष राजेश शिंदे यांच्यासह नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *