नामस्मरण आणि कृतज्ञता यात जितकी ताकद अहे ना तितकी ताकद कदाचित कष्टातही नसेल .. याचा अनुभव मी वारंवार घेते असाच एक अनुभव आता शेअर करणार आहे.. गेल्या आठवड्यात मी एक व्हीडीओ शेअर केला होता त्यात मी माझा जीवनाकडे आणि लक्स्झरीकडे पहाण्याचा दृष्टिकोन सांगितला होता.. आपण जगतो तसा जीवनाचा उद्देश नसून आपण कसं जगायला हवं तसा मनुष्य जीवनाचा उद्देश असायला हवा ..मुळात आपण पृथ्वीवर भाड्याने राहायला आलो आहोत.. श्रीकृष्णाने आपल्या कुवतीनुसार आणि गरजेनुसार आपल्याला जगण्यासाठी काही गोष्टी दिल्या आहेत ज्या काही काळासाठी उपभोगून त्या इथेच ठेवून आपल्याला इथून निघून जायचे आहे हे एकदा लक्षात आलं कि काय सोबत नेणार त्यावर आपण काम करतो… त्या पध्दतीने जगताना भगवंत त्या त्या वेळी तशी तशी माणसं आपल्या संपर्कात आणतो आणि आपल्याला योग्य वेळी योग्य गोष्टी देतो अगदी एकही रुपया आपल्याकडे नसताना..
साधारणपणे सहा महिन्यांपुर्वी माझी तब्बेत अचानक बिघडली आणि माझे मित्र , नवरा सगळे माझ्या दिमतीला उभे राहिले .. ऑपरेशन करावं लागेल असं असताना काहीही न करता मी बरी झाले याचं कारण माझा कृष्ण आणि त्याने पाठवलेले त्याचे दुत म्हणजे माझे मित्र.. त्याचदरम्याने तो मला वृंदावन , मथुरेला घेउन गेला आणि आता मायापूर.. हेही कृष्णामुळेच म्हणजेच त्याने मित्राला आज्ञा दिली असेल कि सोनलसाठी प्रार्थना कर आणि तिला मायापूरला घेउन ये.. मला बरं वाटल्यावर तो मला मायापूरला घेउन येइल असं त्याने कृष्णाला सांगितले आणि मी दर्शन घेउन आले.. काहीजण यावर विश्वास ठेवणार नाहीत पण नामस्मरण आणि कृतज्ञता सोबत असेल तर काहीही शक्य आहे… तळहाताच्या फोडाला जपावं तसं त्या तिघांनी मला तीन दिवस जपलं आणि जराही त्रास होवु न देता पुण्यात पाठवलं.. एअरपोर्टवर घ्यायला मित्र हजर म्हणजे तिथेही सेवा आहेच.. किती आभार मानावेत आणि किती कृतज्ञता व्यक्त करावी ना..
आपल्याकडे भरपूर पैसा , संपत्ती असल्यावर आपल्याजवळ माणसं रहातात हे साफ चूक आहे आणि भरपूर पैसे असल्यावर आपण कुठेही जाऊ शकतो आणि काहीही करु शकतो हेही चुकीचं आहे.. पैसा हा गरजेसाठी आहे आणि आपला चांगुलपणा , आपली कर्म , नामस्मरण , कृतज्ञता , आभार हे सगळं सोबत जाणारं आहे त्यामुळे आपण ते सतत जतन करायला हवं.. अशा लोकांना जपायला हवं जे सतत आपल्या अवतीभवती आपल्या सेवेला हजार असतात आणि कुठलही काम करताना ते भगवंताप्रती हवं.. त्याच्या आज्ञेशिवाय आपण काहीही करु शकत नाही.. त्याचं विशेष लक्ष आपल्याकडे हवं असेल तर सतत त्याच्या नामात रहा. तो आपल्याला योग्य वेळी योग्य गोष्टी देतोच.. कोण कधी कुठल्या रुपात येउन आपल्याला मदत करेल याची आपण कल्पनाही करु शकत नाही.. निसर्गात जाऊन आनंद घेताना ज्याने या सृष्टीची निर्मिती केली त्याला विसरुन कसं चालेल ना.
( जसं टाकीतलं पाणी संपलं कि आपण ती पुन्हा भरतो तसच नामस्मरणाने , चांगल्या वागण्याने आपण आपला घडा सतत भरत रहायचा.. ) कृष्ण सतत आपल्या सोबत असतो हा भाव असला कि एकटेपणा कधीही जाणवत नाही.. ना कशाची भीती रहात..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist