(नायगाव ; माधव बैलकवाड )
एखादा पुरस्कार मिळावा यासाठी शिक्षकांची कार्यप्रणाली नसून नोकरी क्षेत्रात मानाचे स्थान असलेलं पद म्हणजे शिक्षक आपण जिथे आहोत तिथे प्रमाणिकपणे काम केले की त्याची दखल घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्यांना चालना देणे हे शासनाचे काम आहे पण अलीकडे खरे व निष्ठावंत शिक्षकच सदर पुरस्कारापासून वंचित दिसत आहेत नायगाव तालुक्यातील मांजरम येथील रहिवासी असलेले यादव नागोराव नव्हारे या शिक्षकांचा कार्यकाळ पंचवीस वर्षाचा असून या कार्यकाळात शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक गुण आणि निर्व्यशणीपणा व नम्रता अंगी असलेली दिसून येते त्यांच्या सर्व गुण संपन्न कार्याला आदर्श शिक्षक हा पुरस्कार तंतोतंत जुळतो म्हणून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा असे कित्येकांना वाटते.
माधवराव वट्टेमोड विद्यालय जुना कौठा नांदेड येथे गेल्या २५ वर्षापासून शिक्षक पदावर कार्यरत असलेले यादव नवारे यांच्या शाळेतील पंधरा, विस शिक्षकांचा स्टॉप असून या सर्वाकडूनच गेल्या दहा-बारा वर्षांपूर्वी यादव नवारे यांना आदर्श शिक्षक म्हणून संबोधले गेले. एखादा गोड गळ्याचा व्यक्तींना शाहीर म्हणून ओळखले जाते तर वेगवेगळे आवाज काढून मिमिक्री करणाऱ्यांना कलाकार म्हणून ओळखले जाते तसे शिक्षकांचे सुप्त गुण अंगी असणाऱ्या शिक्षकास देखील आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जाते याबाबत यादव नव्हारे यांचे नाव अग्रक्रमाने पुढे येते पण शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन अधिकृत पुरस्कार जाहीर करणे हे यादव नवारे या शिक्षकांसाठी योग्य ठरेल.
शिक्षकवृंद यांची स्वाभिमानाने कशी मान उंचावेल यापैकी नव्हारे आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही, कारण मी एक समाजाचा आरसा आहे ही जाणीव मनाशी ठेवून आपल्या जीवनात कटिबद्ध ते आहेत आजवर कुठलेही व्यसन त्यांच्या अंगी नाही एवढेच नाही तर त्यांनी आपल्या गावी वेसनमुक्ती आंदोलन देखील राबविले गावात
शासनमान्य असलेले दारूचे दुकान देखील महिलांच्या पुढाकाराने बंद करण्यात आले कारण दारूमुळे असंख्यजनाचे संसार देशोधडीला लागले हे मार्गदर्शन त्यांचे अनेकांना योग्य वाटले तर आपल्या गावासह इतर गावातील तरुण मुले निर्देशनी बनावीत म्हणून व्यशन मुक्ती ग्राम क्रांती
महासंघाच्या मांजरम सर्कल प्रमुख पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन व्यशनमुक्ती कार्यात देखील ते कार्यरत आहेत. आपल्या शाळेसह तालुका जिल्हा पातळीवर शिक्षक मित्राचा अत्यंत विश्वासू मित्र यादव नव्हारे हे झाले म्हणून शिक्षक परिषदेच्या नांदेड जिल्हा कोषाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. बहुजन लोकात अज्ञान आळस व व्यसनीपणा जास्तीचा दिसून येते ही पूर्वीपासूनच मरगळ समाजात आहे हे झिडकारून नव्या प्रगतीच्या मार्गाने चालण्यासाठी महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीपिता लहुजी साळवे वंदनीय महात्मा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराशिवाय पर्याय नाही म्हणून या मानवतावादी विचारांचे ते पुरस्कर्ते झाले. या महामानवाच्या विचाराचे संघटन असलेल्या बामसेफ या संघटनेच्या नांदेड तालुकाध्यक्षपदावरती कार्यरत आहेत. समाजात अनेक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीचे दिसून येतात कोण्या अडल्या नडल्या गरजूंना दहा रुपयेची
मदत देण्यासाठी दहा लोक जमा करून दहावीस फोटो काढणारे अनेक जण आपण बघितले परंतु यादव नवारे गुरुजी हे आजवर अनेकांना सढळ हाताने मदत केली पण कधी देखावा केलेला नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो, महाराष्ट्रातील अनेक जिल्हे वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात .
नांदेड हा देखील कवीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या कविवर्य महोदय यांच्या यादीत देखील यादव नव्हारे यांचे नाव आहे त्यांनी आजवर ४०-५० कविताची रचना केली आहे असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व असलेले यादव नव्हारे हे एक आगळवेगळे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात काही फायदा घेतात काही आधार देतात फरक फक्त एवढाच आहे की फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे हृदयात राहतात सर्वांच्या हृदयात राहणारे यादव नव्हारे या शिक्षकास शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करावे, चांगल्या व्यक्तीचा सन्मान समाज करते तर शासनाने ही करावे एवढेच.

