नांदेड ; गंगाधर ढवळे
शिक्षकांच्या विविध प्रश्नासंदर्भात आवाज उठवून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत संघर्षशील असलेल्या प्रहार शिक्षक संघटनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी हरणवाडी ता. लोहा येथील मुख्याध्यापक मल्लिकार्जुन जोडराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी दिले. लोहा येथील संघटनेची बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यात जोडराणे यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष किरण राठोड, बालाजी कनशेट्टे (नांदेड) यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. शिक्षकांचे न्याय्य प्रश्न या संघटनेच्या माध्यमातून सोडविणार असल्याचे यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले. यावेळी बसवेश्वर मरशिवणे, सुदर्शन पवळे, राजकुमार यादव, प्रमोद पाटील, उल्हास चव्हाण, बबन साखरे, बसवेश्वर वडिले, राजू देवकते, नागेश स्वामी, केशव कदम, संजय जाधव, भाऊसाहेब राठोड आदींची उपस्थिती होती. जोडराणे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.