नांदेड ;
सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू करता आल्या नाहीत परंतु सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा पर्याय यात टीव्ही, मोबाईल,रेडिओ या माध्यमांचा वापर करून सर्व मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे काम सुरू आहे परंतु सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण देताना अडचणी निर्माण होत आहेत कारण सर्वांकडेच रेडियो,टीव्ही, स्मार्टफोन उपलब्ध नाहीत यावर उपाय म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील उपक्रम शील शिक्षक रवी ढगे यांनी राज्यातील विविध व्हाट्सअप ग्रुप वर आलेल्या अभ्यासाचे योग्य विश्लेषण करून त्यांचे वर्गानुसार घरचा अभ्यास या शिर्षकाखाली संकलन केले आहे. शाळेतील पहिली ते सातवीचे वर्ग विद्यार्थी संख्या 185 असून सर्व विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास च्या प्रती वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथे दि.१ अॉगस्ट रोजी संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरवातीला लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर नांदेड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर ,लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, कापसी बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी कृष्णकुमार फटाले , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनुरथ पाटील ढगे ,मारतळा केंद्राचे केंद्रप्रमुख डी. पी. पाटील, केंद्रीय मुख्याध्यापक आनंद दरेगावे ,अखिल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक अंतराचे पालन करून वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांनी केंद्रांतर्गत मुख्याध्यापकांची सहविचार सभा घेतली .यावेळी ते म्हणाले मारतळा शाळेचा घरचा अभ्यास हा उपक्रम स्तुत्य उपक्रम असून यात सर्व मुलांना अभ्यास देणे सोपे जाते हा उपक्रम सर्व जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळेत राबवावा असे आव्हान त्यांनी केले तसेच स्वतः स्वाध्याय तयार करून मुलांना उपलब्ध करून द्यावेत व शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार अभ्यासाचे नियोजन सर्वांनी करणे अत्यंत आवश्यक आहे.वर्गातील सर्व मुलांसोबत आपण संवाद साधणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण उपलब्ध करून देण्याचा पर्याय शिक्षक हा एकमेव आहे. त्यामुळे आपली जबाबदारी या काळात वाढलेली आहे.दिलेला अभ्यास मुलांनी कितपत सोडवलाय त्याच्या अडचणी जाणून घेऊन त्याला शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्याची गरज आहे.त्यादृष्टीने मारतळा केंद्र जिल्ह्यातील आदर्श केंद्र कसे होईल या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.मारतळा येथील सर्व शाळेतील शिक्षकांचे शिक्षकांचे अभिनंदन केले.
यावेळी गटशिक्षण अधिकारी रवींद्र सोनटक्के शिक्षण विस्ताराधिकारी कृष्णकुमार फटाले यांनी मार्गदर्शन केले.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपक्रमशील शिक्षक रवी ढगे ,प्रल्हाद पवार व्यंकट मुगावे देवबा होळकर सौ.माधुरी मलदोडे, सौ.जयश्री बारोळे,सौ.उज्वला जोशी ,रमेश हनुमंते आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद पवार तर आभार रवी ढगे यांनी मानले.