प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या पत्नींची संघटना आयएएसओडब्ल्यूए (IASOWA) ही अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असलेली सामाजिक कार्यासाठी कटिबद्ध असलेली संस्था आहे. या संस्थेच्या महाराष्ट्र शाखेमार्फत शोभा अरुण नाईक आणि यास्मिन फिरोज मोमिन या स्वयंसाहाय्य गटातील दोन विधवा महिलांना शिलाई आणि कटर मशीनचे वितरण #सीएसआर च्या माध्यमातून (दि. ८ ऑगस्ट) मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती अर्चना मीना, सचिव श्रीमती आर.विमला, खजिनदार झेबा नाईक, सुप्रिया छडगल यांच्यासह संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्य तसेच आयडीबीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.

